IPL 2019 : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने अगदी शेवटच्या चेंडूवर ६ धावांनी विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज असताना बंगळुरुला केवळ एकच धाव घेता आली. या सामन्यात नो बॉल प्रकरणावरून बंगळुरूच्या डावातील शेवटचे षटक गाजले गाजले. तर हार्दिक पांड्याच्या तुफान फटकेबाजीमुळे मुंबईच्या डावातील शेवटचे षटक गाजले.
हार्दिक पांड्याने बंगळुरुच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. त्याने सामन्यात धमाकेदार फटकेबाजी करत १४ चेंडूत ३२ धावा केल्या. या ३२ धावांच्या खेळीत त्याने २ चौकार आणि तब्बल ३ षटकार खेचले. मुंबईच्या सलामीवीरांनी चांगली कामगिरी केली, मात्र मधल्या फळीतील फलंदाज विचित्र फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाले. अखेर हार्दिक पांड्याने केलेल्या फटकेबाजीमुळे जोरावर मुंबई इंडियन्सला १८७ धावांचा टप्पा गाठता आला. या सामन्यातील पहिल्या डावात सर्वात आकर्षक ठरलेला क्षण म्हणजे…. हार्दिक पांड्याने षटकार लागवल्यानंतर दाखवलेला दम आणि दंडातील बेटकुळी!
शेवटचे षटक कोहलीने मोहम्मद सिराजकडे सोपवले. या षटकात हार्दिकने त्याचे भरगच्च धावांनी स्वागत केले. अखेरच्या षटकात सिराजच्या तब्बल १५ धावा खर्ची घातल्या. या षटकात पाचव्या चेंडूवर पांड्याने उत्तुंग असा षटकार लगावला. हा षटकार छताच्या वर टप्पा पडून थेट मैदानाबाहेर गेला. यावेळी हार्दिकने ‘हम भी कुछ कम नही’ अशा अंदाजात दंडातील बेटकुळी दाखवली. महत्वाचे म्हणजे त्याने असे केल्यानंतर विराटचा चेहरा पार उतरला होता. या सामन्यात विराटनेही चांगली खेळी केली. पण त्याला अर्धशतक पूर्ण करता आले नाही.
— Liton Das (@BattingAtDubai) March 28, 2019
—
@hardikpandya7 amazing six stadium ke bhar mza a gya@mipaltan #RohitSharma #HardikPandya #RCBvMI #CricketMeriJaan pic.twitter.com/myJlTARuwJ
— Rohit_sharma45Advance.Happybirthday30April_sir (@Rohitiansagar45) March 29, 2019
दरम्यान, बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सवर ६ धावांनी मात केली. बाराव्या हंगामातला मुंबई इंडियन्सचा हा पहिला विजय ठरला. एबी डिव्हीलियर्सने फटकेबाजी करत मुंबईच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र जसप्रीत बुमराहने १९ व्या षटकात भेदक मारा करत बंगळुरुचं आव्हान आणखी खडतर केलं. यानंतर अखेरच्या षटकात विजयासाठी आवश्यक असलेल्या १८ धावा पूर्ण करत बंगळुरुला जमलं नाही. बुमराहने आजच्या सामन्यात ३ बळी घेतले. लसिथ मलिंगाच्या अखेरच्या षटकात मुंबईच्या शिवम दुबेने षटकार खेचत रंगत निर्माण केली होती. मात्र मलिंगाने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. एबी डिव्हीलियर्सने ७० धावांची खेळी केली. मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहलीनेही चांगली फलंदाजी केली.
त्याआधी, युजवेंद्र चहलने मोक्याच्या क्षणी केलेला भेदक मारा आणि त्याला अन्य गोलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर बंगळुरुने घरच्या मैदानावर खेळत असताना मुंबई इंडियन्सला १८७ धावांवर रोखलं.पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या मुंबई इंडियन्सने डावाची सुरुवात चांगली केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. युजवेंद्र चहलने डी-कॉकचा त्रिफळा उडवत बंगळुरुला पहिला धक्का दिला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि युवराज सिंह यांनी फटकेबाजी करत रोहित शर्माला चांगली साथ दिली. यामुळे मुंबईने आश्वासक धावसंख्या गाठली. मात्र मोक्याच्या क्षणी बंगळुरुच्या गोलंदाजांनी विकेट काढत मुंबईला बॅकफूटवर ढकललं. त्यातच मुंबईच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी आजच्या सामन्यात पुरती निराशा केली. कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, मिचेल मॅक्लेनघन हे फलंदाज आज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने मुंबईच्या डावाला खिंडार पाडलं. त्याने ४ बळी घेतले. त्याला उमेश यादव आणि मोहम्मद सिराजने चांगली साथ दिली.
