आयपीएल २०२२च्या तयारीला सुरुवात झाली आहे. सर्व संघ मेगा ऑक्शनच्याच्या तारखेची वाट पाहत आहेत. मेगा लिलावातच, फ्रेंचायझी खेळाडूंची खरेदी करतील आणि आयपीएल २०२२साठी सज्ज असतील. आयपीएलच्या या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे. अहमदाबाद फ्रेंचायझीने आपल्या संघाच्या नावाची घोषणा केली आहे. हा संघ आता अहमदाबाद टायटन्स नावाने ओळखला जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहमदाबादपूर्वी लखनऊ फ्रेंचायझीने आपल्या संघाच्या नावाची घोषणा केली. लखनऊ संघाने नाव लखनऊ सुपरजायंट्स असे आहे. केएल राहुल या संघाचा कप्तान आहे, तर हार्दिक पंड्या अहमदाबाद संघांचे नेतृत्व करणार आहे. हार्दिकसोबत राशिद खान आणि शुबमन गिल अहमदाबाद फ्रेंचायझीचा भाग असणार आहेत.

हेही वाचा – सौरव गांगुलीच्या ‘त्या’ सल्ल्याकडं हार्दिक पंड्यानं केलं दुर्लक्ष; घेतला ‘मोठा’ निर्णय!

अहमदाबाद हा आयपीएलचा नवा संघ आहे. या संघाला मेगा लिलावापूर्वी तीन खेळाडूंना कायम ठेवण्याचा अधिकार आहे. या अंतर्गत त्यांनी हार्दिक, राशिद आणि शुबमन यांची निवड केली आहे. अहमदाबाद फ्रेंचायझीने आपल्या कोचिंग स्टाफचीही निवड केली आहे. आशिष नेहरा आणि गॅरी कर्स्टन यांना संघाने सोबत घेतले आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा माजी फलंदाज विक्रम सोलंकीला संघ संचालक बनवण्यात आले आहे. अहमदाबाद फ्रेंचायझीची मालकी CVC कॅपिटल पार्टनर्सकडे आहे.

यावर्षी आयपीएलमध्ये एकूण १० संघ असतील. यावेळी आयपीएलमध्ये मेगा लिलाव होत आहे. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे लिलाव होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 ahmedabad titans is the official name of the ahmedabad team adn