बंगळुरूमध्ये आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन यशस्वीरित्या पार पडले. काल आणि आज झालेल्या या महालिलावात अनेक खेळाडूंचे नशीब उघडले, तर काहींना अजून या श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. डावखुरा फलंदाज इशान किशन (१५.२५) या लीगचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर लिलावाच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनने ११.५० कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे मिस्टर आयपीएल अशी ओळख असलेल्या सुरेश रैनाला संघात घेण्यात चेन्नईने रस दाखवला नाही. आता अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन सघांची एन्ट्री झाल्यामुळे चाहत्यांना लीगच्या प्रारंभाची उत्सुकता लागली आहे.

Live Updates
19:44 (IST) 13 Feb 2022
कुलदीप सेनसाठी बोली

राजस्थानने कुलदीपसाठी २० लाख मोजले.

19:43 (IST) 13 Feb 2022
हरनूर सिंग अनसोल्ड

हरनूर सिंग अनसोल्ड

19:42 (IST) 13 Feb 2022
कर्ण शर्मासाठी बोली

आरसीबीने कर्णसाठी ५० लाखांची बोली लावली आणि संघात सामील केले.

19:42 (IST) 13 Feb 2022
कैस एहमद अनसोल्ड

कैस एहमद अनसोल्ड

19:41 (IST) 13 Feb 2022
लुंगी एनगिडीसाठी बोली

दिल्ली संघाने ५० लाख मोजत एनगिडीला आपल्या ताफ्यात सामील केले.

19:40 (IST) 13 Feb 2022
शेल्डन कॉट्रेल अनसोल्ड

शेल्डन कॉट्रेल अनसोल्ड

19:40 (IST) 13 Feb 2022
जिमी नीशम अनसोल्ड

जिमी नीशम अनसोल्ड

19:39 (IST) 13 Feb 2022
ख्रिस जॉर्डनसाठी बोली

चेन्नईने ख्रिस जॉर्डनसाठी ३.६० कोटींची बोली लावली आणि त्याला संघात घेतले.

19:37 (IST) 13 Feb 2022
विष्णू विनोदसाठी बोली

हैदराबादने विष्णू विनोदसाठी ५० लाख खर्च केले.

19:35 (IST) 13 Feb 2022
एन. जगदीशनसाठी बोली

चेन्नईने जगदीशनसाठी २० लाख मोजले.

19:34 (IST) 13 Feb 2022
अनमोलप्रीत सिंग

मुंबई इंडियन्सने अनमोलप्रीतला २० लाखात सामील केले.

19:34 (IST) 13 Feb 2022
सी हरि निशांतसाठी बोली

चेन्नईने सी हरि निशांतसाठी २० लाखांची बोली लावत संघात घेतले.

19:33 (IST) 13 Feb 2022
उमेश यादव अनसोल्ड

उमेश यादव अनसोल्ड

19:32 (IST) 13 Feb 2022
मॅथ्यू वेडसाठी बोली

गुजरातने वेडसाठी २.४० कोटी मोजले.

19:30 (IST) 13 Feb 2022
वृद्धिमान साहासाठी बोली

वृद्धिमान साहाला गुजरातने १.९० कोटींची बोली लावत संघात दाखल केले.

19:28 (IST) 13 Feb 2022
सॅम बिलिंग्जसाठी बोली

केकेआरने बिलिंग्जसाठी २ कोटी खर्च केले.

19:27 (IST) 13 Feb 2022
शाकिब अल हसन अनसोल्ड

शाकिब अल हसन अनसोल्ड

19:26 (IST) 13 Feb 2022
डेव्हिड मिलरसाठी बोली

राजस्थान आणि गुजरातने मिलरसाठी सुरुवातीला बोली लावली. गुजरातने ३ कोटी खर्च मिलरला आपल्या संघात सामील केले.

18:18 (IST) 13 Feb 2022
अरुणय सिंगसाठी बोली

राजस्थानने २० लाखांची बोली लावत अरुणयला आपल्या संघात सामील केले.

18:15 (IST) 13 Feb 2022
आशुतोष शर्मा अनसोल्ड

आशुतोष शर्मा अनसोल्ड

18:15 (IST) 13 Feb 2022
अशोक शर्मासाठी बोली

केकेआरने अशोक शर्मासाठी ५५ लाखांची बोली लावली.

18:13 (IST) 13 Feb 2022
अंश पटेलसाठी बोली

पंजाब किंग्जने अंशसाठी २० लाखांची बोली लावली.

18:12 (IST) 13 Feb 2022
मोहम्मद अशरफसाठी बोली

मुंबईने अशरफसाठी बोली लावली. २० लाखांत त्यांनी अशरफला संघात दाखल केले.

18:10 (IST) 13 Feb 2022
ललित यादव अनसोल्ड

ललित यादव अनसोल्ड

18:10 (IST) 13 Feb 2022
सौरभ दुबेसाठी बोली

हैदराबादने दुबेसाठी २० लाखांची बोली लावली.

18:09 (IST) 13 Feb 2022
बलतेज दांडासाठी बोली

पंजाब संघाने बलतेजसाठी २० लाखांची बोली लावली.

18:09 (IST) 13 Feb 2022
करण शर्मासाठी बोली

लखनऊ संघाने करणसाठी २० लाख मोजले.

18:08 (IST) 13 Feb 2022
अमित अली अनसोल्ड

अमित अली अनसोल्ड

18:07 (IST) 13 Feb 2022
काईल मेयर्ससाठी बोली

लखनऊ संघआने मेयर्ससाठी बोली लावली. त्यांनी ५० लाखात मेयर्सला आपल्या संघाशी जोडलेय

18:07 (IST) 13 Feb 2022
शशांक सिंगसाठी बोली

हैदराबादने शशांकसाठी २० लाख मोजले.