Ben Stokes will not be able to play the final match: इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या मोसमात, चेन्नई सुपर किंग्ज अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. मंगळवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये सीएसकेने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, फायनलपूर्वी चेन्नई सुपर किंग्जसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सीएसकेचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सही अंतिम सामन्यात खेळताना दिसणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीएसकेने मोठ्या आशेने लिलावात बेन स्टोक्सवर बोली लावली होती. सीएसकेने बेन स्टोक्सला १६.२५ कोटी रुपये देऊन खरेदी केले. पण सीएसकेचा हा सट्टा फ्लॉप ठरला. या हंगामात बेन स्टोक्सने केवळ दोनच सामन्यांमध्ये भाग घेतला. या दोन सामन्यांमध्ये बेन स्टोक्सला फलंदाजीत काही अप्रतिम दाखवता आले नाही आणि त्याने केवळ १५ धावा केल्या. दुखापतीमुळे बेन स्टोक्स गोलंदाजी करणार नसल्याचे आधीच स्पष्ट झाले होते.

दुखापतीत वाढ झाल्याने बेन स्टोक्स गेल्या आठवड्यात इंग्लंडमध्ये परतला होता. बेन स्टोक्स अंतिम सामन्यासाठी भारतात परतणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सीएसके पुढील वर्षासाठी बेन स्टोक्सला कायम ठेवणार की नाही हे स्पष्ट नाही.

हेही वाचा – CSK vs GT: ”…म्हणून चेन्नईविरुद्ध गुजरातचा पराभव झाला”; दीपक चहरने सांगितले पराजयाचे सर्वात मोठे कारण

स्टोक्सचा रेकॉर्ड खराब –

गेल्या काही वर्षांत बेन स्टोक्सचा आयपीएलमधील सहभागाचा विक्रम खूपच खराब राहिला आहे. गेल्या वर्षी बेन स्टोक्स खरेदीसाठीही उपलब्ध नव्हता. २०२१ मध्ये स्टोक्सने राजस्थान रॉयल्ससाठी फक्त एकच सामना खेळला होता. त्यानंतर राजस्थानने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – VIDEO: आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने ख्रिस गेलला अश्रू अनावर, इन्स्टावर शेअर केली भावनिक पोस्ट

२०२० मध्येही बेन स्टोक्स राजस्थान रॉयल्ससाठी फक्त ८ सामने खेळला होता. आयपीएलच्या ६ वर्षांच्या कारकिर्दीत बेन स्टोक्सने केवळ ४५ सामने खेळले आहेत. तरी बेन स्टोक्सने इतक्या कमी सामन्यांमध्ये दोन शतके झळकावली आहेत. या कारणास्तव, संघ त्याला प्रत्येक वेळी लिलावात मोठी रक्कम देऊन खरेदी करत आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ben stokes will not be able to play the final match of ipl 2023 for csk vbm