Fastest Bowlers in IPL History : आयपीएल २०२४ च्या हंगामातील ११व्या सामन्यात उजव्या हाताचा युवा वेगवान मयंक यादवने आपल्या गतीने सर्वांना प्रभावित केले. मयंकने आपल्या कारकिर्दीतील पहिल्या आयपीएल सामन्यात १५५.८ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकून चर्चेत आला. त्याने लखनऊला पंजाबविरुद्ध गमावलेल सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनला मयंकने आयपीएल हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला.

एकना स्टेडियमवर या २१ वर्षीय गोलंदाजाची वेगवान मारा पाहून शिखर धवनही थक्क झाला. मयंक यादव उमरान मलिकचा विक्रम मोडू शकणार का हे जाणून घेण्याची उत्सुकता आता क्रिकेटप्रेमींना लागली आहे. आयपीएलच्या इतिहासात कोणत्या गोलंदाजाने सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे? टॉप ५ गोलंदाजांच्या यादीत भारतीय गोलंदाज कुठे आहे ते जाणून घेऊया.

मयंक यादव दुखापतीमुळे नुकत्याच पार पडलेल्या रणजी स्पर्धेत खेळू शकला नाही. त्याच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर लखनऊ सुपरजायंट्स संघाने १९९ धावांचा यशस्वी बचाव केला. मयंकने पंजाब किंग्जच्या डावातील १२व्या षटकात ताशी १५५.८ किलोमीटर वेगाने चेंडू टाकला, जो आयपीएल २०२४ हंगामातील सर्वात वेगवान चेंडू ठरला. यादरम्यान त्याने वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गरचा विक्रम मोडला, ज्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना हा विक्रम केला होता.

हेही वाचा – Mayank Yadav : ‘… कुठे लपला होतास’, माजी दिग्गज डेल स्टेनकडून भारताच्या युवा वेगवान गोलंदाजाचे कौतुक

आतापर्यंत आयपीएल २०२४ मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणारे गोलंदाज –

१५५.८ किमी प्रतितास – मयंक यादव – एलएसजी वि पीबीकेएस
१५३.९ किमी प्रतितास – मयंक यादव – एलएसजी वि पीबीकेएस
१५३.४ किमी प्रतितास – मयंक यादव – एलएसजी वि पीबीकेएस
१५३ किमी प्रतितास – नांद्रे बर्गर – आरआर वि डीसी
१५२.३ किमी प्रतितास – जेराल्ड कोएत्झी – एमआय वि एसआरएच
१५१.२ किमी प्रतितास – अल्झारी जोसेफ – आरसीबी वि केकेआर
१५०.९ किमी प्रतितास – मथीशा पथिराणा – सीएसके वि जीटी

आयपीएल २०२४ मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणारे टॉप-५ गोलंदाज –

आयपीएलच्या १७ व्या मोसमात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम मयंक यादवच्या नावावर नोंदवला गेला आहे. १५५.८ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकून मयंक पहिल्या क्रमांकावर आहे. ताशी १५३ किलोमीटर वेगाने चेंडू फेकून नांद्रे बर्गर दुसऱ्या क्रमांकावर आहे. बर्गरने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ही कामगिरी केली होती, तर मुंबई इंडियन्सकडून खेळणारा गेराल्ड कोएत्झी (१५२.३ किमी प्रतितास) तिसऱ्या स्थानावर आहे तर अल्झारी जोसेफ (१५१.२ किमी प्रतितास) चौथ्या स्थानावर आहे. सीएसकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराना(१५०.९ किमी प्रतितास) पाचव्या स्थानावर आहे.

आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणारे टॉप – ६ गोलंदाज –

सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने आयपीएलमध्ये ताशी १५७ किलोमीटर वेगाने गोलंदाजी केली आहे. उमरानने २०२२ मध्ये हा पराक्रम केला होता. आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मयंक सहाव्या तर उमरान मलिक तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का! ‘हा’ प्रमुख खेळाडू टाचेच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार

ताशी १५७.७१ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकून ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेट पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने २०११ मध्ये ही कामगिरी केली होती, तर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (१५७.३ किमी प्रतितास) दुसऱ्या स्थानावर आहे. फर्ग्युसनने २०२२ मध्ये ही कामगिरी केली होती. एनरिक नॉर्खिया १५६.२२ किमी प्रतितास वेगासह चौथ्या क्रमांकावर आहे. उमरान पुन्हा पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याने २०२२ मध्ये १५६ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता.

आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणारे टॉप – ६ गोलंदाज –

शॉन टेट – १५७ .७१ किमी प्रतितास
लॉकी फर्ग्युसन – १५७.३ किमी प्रतितास
उमरान मलिक – १५७ किमी प्रतितास
समृद्ध नॉर्टजे – १५६.२२ किमी प्रतितास
उमरान मलिक – १५६ किमी प्रतितास
मयंक यादव १५५.८ किमी प्रतितास