उमरान मलिक (Umran Malik) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. तो सध्या भारतामधील सर्वात वेगवान गोलंदाज आहे. उमरानचा जन्म २२ नोव्हेंबर १९९९ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झाला. लहानपणापासून क्रिकेटची (Cricket) आवड असणाऱ्या उमरानचा क्रिकेटच्या प्रवास २०२१ मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जम्मू-काश्मीर संघामध्ये खेळून सुरु झाला. त्याच वर्षी त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्येही पदार्पण केले. आयपीएल २०२१ मध्ये सनराइजर्स हैदराबाद या संघाने नेट बॉलर म्हणून उमरानची निवड केली. पुढे करोना झाल्याने टी.
नटराजनच्या जागी त्याला खेळवण्यात आले. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी तो पहिला आयपीएल सामना खेळला. सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यामध्ये उमरान मलिकने एका षटकामध्ये सलग ५ चेंडू १५० किमी प्रतितासपेक्षा जास्त वेगाने टाकले. या सामन्यापासून तो चर्चेत आला. २०२२ मध्येही त्याला संघामध्ये खेळवण्यात आले.
जानेवारी २०२३ मध्ये, त्याने श्रीलंकेविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये १७ व्या षटकात १५५ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकत जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडला.Read More
Umran Malik bowled Padikkal: सध्या भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आयपीएल २०२३च्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या देवदत्त पडिक्कलला क्लीन…
Sohail Khan on Umran Malik: पाकिसत्तानचा माजी गोलंजदाज सोहेल खानने उमरान मलिकच्या गोलंदाजीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्यामते, उमरान मलिकसारखे बरेचसे…