चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) वेगवान गोलंदाज दीपक चहर आयपीएल २०२२ च्या हंगामातून बाहेर झालाय. त्यामुळे सीएसकेला मोठा धक्का बसला आहे. याबाबत सीएसकेने अधिकृत निवेदन जारी करत माहिती दिली. यानुसार, दीपक चहरच्या पाठीला दुखापत झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीएसकेने आपल्या चाहत्यांना चहर लवकर बरा होण्यासाठी सदिच्छा देण्याचं आवाहन केलंय.

आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर दीपक चहरने यावर पहिली प्रतिक्रिया दिलीय. चहर म्हणाला, “दुर्दैवाने दुखापत झाल्यामुळे मला यंदाच्या आयपीएल हंगामात सहभागी होता येणार नाही. मला खरंच खेळण्याची इच्छा होती, मात्र मी नेहमीप्रमाणे आहे त्यापेक्षा चांगल्या स्थितीत पुनरागमन करेल. तुम्ही कायम दिलेल्या प्रेम, सदिच्छा आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. लवकरच तुम्हाला भेटेल.”

यंदा ‘आयपीएल’च्या खेळाडू लिलावात चेन्नईने चहरसाठी १४ कोटी रुपये मोजले होते. पायाच्या दुखापतीमुळे त्याला सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागले. परंतु, बंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) उपचार घेतल्यानंतर एप्रिलच्या मध्यात तो चेन्नई संघात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, ‘एनसीए’मध्ये सरावादरम्यान चहरच्या पाठीला दुखापत झाली असून त्याला उर्वरित ‘आयपीएल’मध्येही खेळता येणार नाहीये.

दरम्यान, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला ‘आयपीएल’च्या पुढील किमान दोन सामन्यांना मुकावे लागेल, अशी माहिती सनरायजर्स हैदराबाद संघाचे प्रशिक्षक टॉम मूडी यांनी दिली. हैदराबादचे पुढील दोन सामने कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्याविरुद्ध अनुक्रमे शुक्रवार आणि रविवारी होणार आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak chahar ruled out of ipl 2022 due to back injury csk announce pbs