Dwayne Bravo Reveals About Ajinkya Rahane: आयपीएल २०२३ मध्ये २७ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मोठा सामना होणार आहे. हा सामना जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियम खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ड्वेन ब्राव्होने सीएसकेसाठी शानदार फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली. त्याने रहाणेचे वर्णन आयपीएलमधील सर्वोत्तम स्थानिक खेळाडूंपैकी एक म्हणून केले आहे. यासोबतच त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमागचे रहस्यही उघड केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेस्ट इंडिजचा महान अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. ब्राव्होच्या मते, सीएसके मधील प्रत्येक खेळाडूला मुक्तपणे खेळण्याची परवानगी असते, त्यामुळे रहाणे अशी कामगिरी करू शकला.

मी अजिंक्य रहाणेचा खूप मोठा चाहता – ड्वेन ब्राव्हो

ड्वेन ब्राव्होने अजिंक्य रहाणेचे जोरदार कौतुक केले आहे. तो म्हणाला, “रहाणे हा भारतातील सर्वोत्तम स्थानिक खेळाडूंपैकी एक आहे. मी त्याचा खूप मोठा चाहता आहे. तो राजस्थान रॉयल्सकडून खेळायचा तेव्हाही मला तो खूप आवडायचा. त्यामुळे तो आता आमच्या टीमचा एक भाग आहे याचा आम्हाला आनंद आहे. होय, त्याच्या खेळात नक्कीच बदल झाला आहे, पण त्याच्यात नेहमीच क्षमता होती.”

हेही वाचा – IPL 2023 RCB vs KKR: आरसीबी विरुद्धच्या वादळी खेळीनंतर जेसन रॉयला मोठा फटका, ‘या’ कारणासाठी ठोठावला दंड

ब्राव्होने रहाणेबाबत केला खुलासा –

या मोसमात अजिंक्य रहाणे निर्भयपणे का फलंदाजी करत आहे. या संदर्भात ब्राव्हो म्हणाला की, “सीएसकेमधील कोणत्याही खेळाडूवर कोणताही दबाव आणला जात नाही. त्यांना स्वतःच्या हिशोबाने खेळण्याची परवानगी दिली जाते. रहाणेने हे सिद्ध केले आहे की, तो भारतातील सर्वोत्तम प्रतिभावंतांपैकी एक आहे. त्याची भारतीय संघात निवड झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.”

हेही वाचा – IPL 2023: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का! ‘हा’ स्टार अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलच्या १६व्या हंगामातून बाहेर

गेल्या सामन्यात राजस्थानने बाजी मारली होती –

राजस्थानसाठी ही दिलासादायक बाब ठरू शकते की या मोसमात दोन्ही संघांमधला शेवटचा सामना जिंकला होता. डेथ ओव्हर्समध्ये कर्णधार धोनीच्या सुरेख प्रयत्नामुळे चेन्नईने कडवी झुंज दिली असली तरी सुपर किंग्जला त्यांच्या घरच्या प्रेक्षकांसमोर तीन धावांनी पराभव स्वीकारावा लागला. रविवारी चेन्नईने त्यांच्या शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मोसमातील पाचवा विजय नोंदवला. त्याने दहा गुण मिळवले आहेत. येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या विजयासह ती आपला दावा मजबूत करेल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dwayne bravo reveals why ajinkya rahane is batting fearlessly vbm