Fans Chanting Kohli Kohli In Front Of Naveen Ul Haq Video Viral : अफगानिस्तानचा खेळाडू नवीन उल हक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई इंडियन्सविरोधात झालेल्या सामन्यात नवीन उल हकला कोहलीच्या चाहत्यांनी डीवचलं. नवीन जेव्हा बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करत होता, त्यावेळी चाहते कोहली कोहलीचा नारा लावत नवीनची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत होते. पण नवीनने हे सर्व दृष्य पाहिल्यानंतर दिलेली रिअॅक्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. जेव्हा चाहते कोहली कोहलीच्या घोषणा देत होते, त्यावेळी नवीनने त्यांच्यावर न रागावता त्यांना त्यांच्या भूमिकेवर ठाम राहण्यास सांगितलं. नवीनच्या या व्हायरल व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी लखनऊ आणि बंगळुरुमध्ये झालेल्या एका सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात वादविवाद झाला होता. या संपूर्ण घटनेमुळं क्रीडाविश्वात खळबळ उडाली होती. त्यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहलीच्या चाहत्यांमध्येही सोशल मीडियावर ट्वीटर वॉर सुरु झाला होता. इतकच नव्हे तर लखनऊच्या सामन्यादरम्यान कोहलीच्या चाहत्यांनी गंभीरलाही डीवचण्याचा प्रयत्न केला होता. चाहत्यांच्या या भूमिकेवर गंभीर नाराज असल्याचं समोर आलं होतं. आता मुंबईविरोधात झालेल्या सामन्यातही अशाच प्रकारची घटना घडली. पण यावेळी चाहत्यांनी नवीनला निशाण्यावर घेतलं.
इथे पाहा व्हिडीओ
या सामन्यात मोहसिन खानने शेवटच्या षटकात भेदक मारा करून लखनऊला विजय मिळवून दिला. त्यामुळे लखनऊचा प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मार्कस स्टॉयनिसने त्याच्या करिअरमधील सर्वश्रेष्ठ खेळी केली. मार्कसने चौफेर फटकेबाजी करून ८९ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे लखनऊला २० षटकांत तीन विकेट्स गमावून १७७ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने २० षटकात पाच विकेट्स गमावत १७२ धावा केल्या. त्यामुळे पाच धावांनी मुंबईचा पराभव झाला.