Virat Kohli said he can never physical fights: आधुनिक क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक विराट कोहली हा एक आहे. त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी जगभर ओळखला जातो, तसाच तो मैदानावरील आक्रमकतेसाठीही प्रसिद्ध आहे. विराट कोहलीचे सातत्य तसेच तो खेळाला ज्याप्रकारे पुढे नेण्याचा मार्ग हे सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक असण्याचे सर्वात मोठे कारण आहे. सध्या विराट कोहली आयपीएल २०२३ मध्ये व्यस्त आहे. तो आयपीएलमध्ये आरसीबी संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. अशात विराटने त्याच्या मैदानावरील आक्रमकतेबद्दल एक महत्वाचा खुलासा केला आहे.

विराट कोहली जेव्हा कर्णधार होता आणि आता तो संघासाठी फलंदाज म्हणून खेळतो, तेव्हाही त्याच्यात आक्रमकतेची कमतरता नाही. तो विरोधी संघाप्रती आपल्या भावना दाखवण्यापासून कधीच मागे हटत नाही, विशेषत: जेव्हा त्याचा संघ अडचणीत असतो. खरे सांगायचे तर, विराट कोहली त्याच्या आक्रमकतेसाठी कुप्रसिद्ध आहे. मैदानावर असे अनेक क्षण पाहिला मिळाले आहेत, जे क्वचितच विसरता येतील.

कधी तो प्रेक्षकांना मधले बोट दाखवताना दिसला तर कधी तो विरोधी खेळाडूंसोबत तसेच पंचांशी जोरदार वाद घालतानाही दिसला. मैदानावर त्याच्या तोंडून शिवीगाळ होणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु तो कधीही कोणाशीही शारिरीक मारामारी करताना दिसला नाही. आता त्याच्या आक्रमकतेबद्दल, विराट कोहलीने खुलासा केला की तो तोंडी काहीही बोलू शकतो, परंतु कधीही मारामारी करणार नाही.

हेही वाचा – IPL 2023: विराट कोहलीच्या सुरक्षेत मोठी चूक! आरसीबीच्या टीम हॉटेलमधून पोलिसांनी ३ हिस्ट्रीशीटर्सना केली अटक

फिजिकल मारामारी करण्याची कोणतीही शक्यता नाही-

विराट कोहलीने स्टार स्पोर्ट्सला रायझिंग फ्रॉम द अॅशेस या शोमध्ये सांगितले की, फिजिकल मारामारी करण्याची कोणतीही शक्यता नाही. कारण कोणीतरी मला मारुन जाईल आणि मी मरेन, यानंतर माझे काय झाले हे त्याला कळणार नाही. यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा जतीन सप्रूने म्हणाला, तुम्हाला काय फॉलोअप प्रश्न विचारला असता, यावर विराट कोहलीने लगेच सांगितले की, तोंडाने काहीही बोलेन, पण मी शारीरिकरित्या भांडत नाही. तो असेही म्हणाला की, तो मैदानावर फक्त शाब्दिक भांडण करु शकतो. कारण त्याला माहित आहे की शेवटी पंच दोघांना वेगळे करतील आणि भांडण आणखी वाढणार नाही.