आयपीएल टी-२० चा १५ वा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या २६ मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघ आपल्या पहिल्या सामन्यात विजय संपादन करण्यासाठी उत्सूक असून त्या दृष्टीने दोन्ही संघ सराव करत आहेत. दरम्यान, गतवर्षीच्या आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ यावेळी काय कमाल करुन दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सारथ्य महेंद्रसिंह धोनी करणार आहे. कसोटी, एकदिवसीय विश्चचषक तसेच टी-२० सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलेले असल्यामुळे संघाला कशी दिशा द्यायची याचा तगडा अनुभव धोनीकडे आहे. धोनीकडे ऋतुराज गायकवाडसारखे दिग्गज फलंदाज आहेत. तर रविंद्र जडेजा आणि मोईन अली, शिवम दुबेसारखे अष्टपैलू खेळाडू चेन्नईच्या ताफ्यात असल्यामुळे या संघाला अधिक बळ मिळालेलं आहे. चेन्नईकडे दीपक चहर आणि ड्वेन ब्राव्होसारखे गोलंदाज आहेत. या कसलेल्या गोलंदाजांच्या बळावर धोनीला विरोधी संघाच्या फलंदाजांना रोखणं सोपं जाणार आहे.

आयपीएल टी-२० ट्रॉफीच्या सुरुवातीपासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचं कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीने भूषवलं आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आतापर्यंत चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेली आहे. २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ वा हंगामाचं जेतेपद चेन्नईने पटकावलेलं आहे. यावेळीदेखील चेन्नईचा विजयी रथ अशाच प्रकारे दौडणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रिटेन केलेले खेळाडू

महेंद्रसिंह धोनी- फलंदाज, यष्टीरक्षक – १२ कोटी रुपये
रविंद्र जडेजा- अष्टपैलू – १६ कोटी रुपये
मोईन अली- अष्टपैलू – ८ कोटी रुपये
ऋतुराज गायकवाड- फलंदाज – ६ कोटी रुपये

चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सर्व खेळाडू

महेंद्रसिंह धोनी (फलंदाज, यष्टीरक्षक, कर्णधार, १२ कोटी), रविंद्र जडेजा (अष्टपैलू, १६ कोटी), मोईन अली (८ कोटी रुपये), ऋतुराज गायकवाड (फलंदाज, ६ कोटी), ड्वेन ब्राव्हो (गोलंदाज, ४.४ कोटी), अंबाती रायडू ( फलंदाज, यष्टीरक्षक, ६.७५ कोटी), केएम असिफ (गोलंदाज, २० लाख), तुषार देशपांडे (गोलंदाज २० लाख), दीपक चहर (गोलंदाज, १४ कोटी), शीवम दुबे (अष्टपैलू, ४ कोटी), महेश थिक्षाना (गोलंदाज ७० लाख), राजवर्धन हंगरकेकर (गोलंदाज, १.५ कोटी), सिमरजीत सिंग (गोलंदाज, २० लाख), डेव्हॉन कॉन्वे (फलंदाज, १ कोटी), ड्वेन प्रिटोरियस (अष्टपैलू, 50 लाख) मिचेल सॅटनर (गोलंदाज १.९ कोटी) अॅडम मिल्ने (गोलंदाज, १.९ कोटी), शुभ्रांशू सेनापती (फलंदाज, २० लाख), मुकेश चौधरी (गोलंदाज, २० लाख), प्रशांत सोळंकी (गोलंदाज, १.२ कोटी) सी हरी निशांत (फलंदाज २० लाख), एन जगदीसन (फलंदाज/यष्टीरक्षक, २० लाख), ख्रिस जॉर्डन (गोलंदाज ३.६ कोटी) के भगत वर्मा (अष्टपैलू, २० लाख)

चेन्नई सुपर किंग्जचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

महेंद्रसिंह धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, शीवम दुबे, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर, अॅडम मिल्ने, महेश थिक्षाना