IPL 2024, Gujarat Titans vs Mumbai Indians: गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. सामना संपल्यानंतर हार्दिक पंड्या माजी कर्णधार रोहित शर्माला मिठी मारायला गेला, जे त्याला चांगलेच महागात पडले. हिटमॅनने पंड्याला सर्वांसमोर चांगलेच खडसावले. तिथे उपस्थित आकाश अंबानीही बघतच राहिला. रोहित पंड्याला घेऊन दोन पावले पुढे गेला आणि त्याच्याशी चर्चा करत होता.

या सामन्यात रोहितच्या चाहत्यांनी हार्दिकला चांगलंच ट्रोल केलं आहे. मुंबई इंडियन्सने दरवर्षीप्रमाणे आयपीएलमधील पहिला सामना गमावत मोहिमेला सुरूवात केली आहे. या सामन्यादरम्यान नवा कर्णधार हार्दिकने काही विचित्र निर्णयही घेतले. ज्याचा फटका संघाला बसला आणि गिलच्या नेतृत्त्वाखालील गुजरातने एम आयचा ८ धावांनी पराभव केला.

हार्दिकच्या अनेक निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ३० गज वर्तुळात क्षेत्ररक्षण करणाऱ्या रोहित शर्मालाही त्याने क्षेत्ररक्षणासाठी सीमारेषेवर पाठवले. तर बुमराह संघात असतानाही नवा चेंडू त्याच्याकडे सोपवण्याऐवजी स्वत गोलंदाजीला सुरूवात केली आणि दोन षटकांमध्ये २० धावा दिल्या. मात्र, सामना संपल्यानंतर हार्दिक पंड्या माजी कर्णधार रोहित शर्माला मिठी मारायला गेला, जे त्याला चांगलेच महागात पडले. हिटमॅनने पंड्याला यानंतर चांगलेच खडसावले.

रोहितने हार्दिकला चांगलेच खडसावले

रोहित आणि पंड्याचा या व्हायरल व्हिडिओमध्ये हार्दिकॉ मागून येऊन रोहित शर्माला मिठी मारतो. मागे वळताच रोहितला कळतं की पंड्या आहे आणि मग रोहित त्याला खडसवायला सुरूवात करतो. या व्हिडिओमध्ये या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे हे कळले नाही. पण रोहित शर्मा ज्या पद्धतीने पंड्यासोबत चर्चा करत होता, त्यावरून तो हार्दिकने (कर्णधार म्हणून) सामन्यात केलेल्या चुकांवर समजावत असल्याचे दिसते. रोहितला त्याच्यावर वैतागताना पाहून पाठीमागे उभे असलेले राशिद खान आणि आकाश अंबानीही बघतच राहिले. दोघांची प्रतिक्रियाही व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. त्यानंतर रोहितला त्याला दोन पावलं पुढे नेऊन समजावू लागला.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्सने ६ गडी गमावून १६८ धावा केल्या. मुंबई इंडियन्ससमोर १६९ धावांचे लक्ष्य होते. मात्र एमआयला २० षटकांत ९ गडी गमावून १६२ धावाच करता आल्या आणि ६ धावांनी सामना गमावला.