इंडियन प्रीमियर लीग २०२३ साठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे.. १५ नोव्हेंबर रोजी कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंची यादी सर्व संघांनी जाहीर केली आहे. दरम्यान सनराइजर्स हैदराबादने एक मोठा निर्णय घेतला आहे. या संघाने आपला कर्णधार केन विल्यमसनला कायम ठेवलेले नाही. येथे कठोर निर्णय घेत सनरायझर्स हैदराबादने त्यांचा कर्णधार केन विल्यमसनला सोडले आहे. न्यूझीलंडला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत नेणारा कर्णधार केन विल्यमसनला सोडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सनरायझर्स हैदराबाद सोडल्यानंतर केन विल्यमसनने आता एक संदेश जारी करून चाहत्यांसाठी एक खास गोष्ट सांगितली आहे. केन विल्यमसन म्हणाला की फ्रँचायझी, टीममेट्स, स्टाफ आणि विशेषत: ऑरेंज आर्मीचे खूप खूप आभार, तुम्ही ही ८ वर्षे संस्मरणीय बनवली आहेत. हा संघ आणि हैदराबाद शहर माझ्यासाठी नेहमीच खास असेल, असे केन विल्यमसन म्हणाला. केन विल्यमसनने आपल्या इंस्टाग्रामवर हा भावनिक संदेश लिहिला, जो खूप व्हायरल झाला.

सनरायझर्स हैदराबादने केन विल्यमसनला सोडले आहे. त्याची लिलावात किंमत १४ कोटी रुपये होती, विल्यमसनने सनरायझर्स हैदराबादकडून ७६ सामने खेळले असून त्याच्या नावावर २१०१ धावा आहेत. केन विल्यमसनने सुमारे १२६ च्या स्ट्राइक रेटने आणि ३६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने ४६ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले.

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल २०१८ च्या अंतिम फेरीत धडक मारली. डेव्हिड वॉर्नरपासून वेगळे झाल्यानंतर केन विल्यमसनने हैदराबादला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले. मात्र, त्याला कोणतेही विजेतेपद जिंकता आले नाही, तसेच खराब फॉर्म आणि संथ फलंदाजीमुळे तो निशान्यावर राहिला.

हेही वाचा – क्रिस्टियानो रोनाल्डोचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘मला मँचेस्टर युनायटेडमधून धोका देऊन ….!’

सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) –

सोडलेले खेळाडू (१२): केन विल्यमसन, निकोलस पूरन, जगदीश सुचित, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमॅरियो शेफर्ड, सौरभ दुबे, सीन अॅबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा, विष्णू विनोद.
सध्याचा संघ : अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक.
पर्समध्ये शिल्लक असलेले पैसे: ४२.२५ कोटी.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kane williamson message for sunrisers hyderabad team ipl retention list ipl 2023 vbm