Premium

KL Rahul: “काहींना काड्या घालण्याची…”, केएल राहुलच्या टीकेवरून गंभीरने नाव न घेता व्यंकटेश प्रसादला मारला टोमणा

केएल राहुल गेल्या काही काळापासून टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विटरवर केएल राहुलवर टीका केली होती. गंभीरने केएलच्या समर्थनार्थ समोर येत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.

Gautam Gambhir raised Venkatesh Prasad's cot without taking his name pointed finger at KL Rahul
सौजन्य- हॉटस्टार (ट्विटर)

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक आहे आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी संघाचे नेतृत्व केएल राहुल करत आहेत. केएल राहुल गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. अलीकडच्या काळात, केएल राहुलने कसोटी संघाचे उपकर्णधारपद गमावले, त्यानंतर त्याला कसोटी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. इतकेच नाही तर माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विटरवर केएल राहुलचा असा बँड वाजवला, ज्यानंतर बराच काळ वाद सुरू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सलामीच्या सामन्यात केएल राहुलच्या मॅचविनिंग इनिंगनंतर व्यंकटेश प्रसादनेही या फलंदाजाचे कौतुक करणारे ट्विट केले. या सगळ्यात गौतम गंभीरने केएल राहुलच्या समर्थनार्थ पुढे येऊन त्याच्या टीकेबाबत व्यंकटेश प्रसादचे नाव न घेता त्याला बरेच काही सांगितले.

हेही वाचा: IPL 2023: “वर्ल्डकप आणि WTC Final साठी…”, IPL फ्रँचायझी बाबतीतील रवी शास्त्रींची विनंती BCCI मान्य करणार का?

काहींना काड्या घालण्याची सवय असते- गौतम गंभीर

स्पोर्ट्स तकवर, जेव्हा गंभीरला विचारण्यात आले की आयपीएल २०२३ मध्ये केएल राहुलवर दबाव असेल का, तेव्हा तो म्हणाला, “काय दबाव?, कसला दबाव?.. गेल्या मोसमात, आम्ही (लखनऊ सुपर जायंट्स) क्रमांक-३ वर स्पर्धा फिनिश केली होती. राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात चुरशीची लढत होती. एकच संघ ट्रॉफी जिंकू शकेल आणि गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले हे उघड होते. गेल्या मोसमात त्यांनी दमदार खेळ दाखवला आणि जर तुम्ही लखनऊ सुपर जायंट्सच्या पदार्पण सीझनकडे बघितले तर, आम्ही नेट रनरेटमुळे तिसरे स्थान मिळवले, जर तुम्ही आयपीएलमध्ये दुसरे स्थान मिळवले तर तुम्हाला अंतिम फेरीत जाण्याच्या दोन संधी मिळतील.”

गंभीर पुढे म्हणाला, “केएल राहुलच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, मला वाटत नाही की तो कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. आयपीएलमध्ये १००० धावा करूनही तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा केल्या नाहीत तर तुम्हाला टीकेला सामोरे जावे लागेल आणि हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे. कारण भारताकडून फक्त १५ खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते, आयपीएलमध्ये १५० खेळाडू निवडले जातात, त्यामुळे या दोघांची (आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट) तुलना करू नका. काहींना काड्या घालण्याची सवय असते. मागचा पुढचा विचार न करता ते टीका करत असतात त्यामुळे फारसे लक्ष देऊ नका.” असे म्हणत व्यंकटेश प्रसादला टोमणा मारला आहे.

हेही वाचा: NZ vs SRI: वादळं वार सुटलं गं अन ब्रेसवेलचा बॉल दिसेना; फलंदाजासह गोलंदाजही झाला चकित, पाहा Video

गंभीर पुढे म्हणाला, “राहुलच्या नावावर आयपीएलमध्ये चार-पाच शतके आहेत आणि तुम्ही अशा खेळाडूबद्दल बोलत आहात ज्याने चार-पाच शतके झळकावली आहेत. इतकेच नाही तर गेल्या मोसमातही त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावले होते. कधी-कधी माजी क्रिकेटपटूंना मसाला हवा असतो, जेणेकरून ते प्रसिद्धीच्या झोतात राहतात. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही अशा खेळाडूंवर टीका करता. मला वाटतं केएल ज्या प्रकारचा खेळाडू आहे, त्याच्यावर कोणतेही दडपण असणार नाही. एका खेळाडूच्या जोरावर तुम्ही स्पर्धा जिंकू शकत नाही. ड्रेसिंग रूममध्ये २५ खेळाडू आहेत, ज्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kl rahul some people can only show the flaws gambhir taunts venkatesh prasad on kl rahul without taking his name avw

Next Story
IPL 2023: “वर्ल्डकप आणि WTC Final साठी…”, IPL फ्रँचायझी बाबतीतील रवी शास्त्रींची विनंती BCCI मान्य करणार का?