Ball Flew in Air Video: श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दोन कसोटी मालिकेत न्यूझीलंडने २-०ने विजय मिळवला. दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने एक डाव आणि ५८ धावांनी विजय नोंदवला. या सामन्यादरम्यान एक विचित्र अशी घटना घडली, जी तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. वास्तविक, या सामन्यादरम्यान चेंडू हवेत उडाला. सामन्यात वारा इतका वेगात वाहत होता की तो चेंडू सोबत घेऊन गेला आणि फलंदाज बघतच राहिला.

फलंदाज पाहताच राहिला

हवेत उडणाऱ्या या चेंडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज मायकल ब्रेसवेल गोलंदाजी करत होता आणि श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्या फलंदाजी करत होता. ब्रेसवेलने चेंडू टाकताच जोरदार वाऱ्यात तो ऑफ साइडकडे वळत राहिला. हे पाहून गोलंदाज आणि फलंदाज दोघेही आश्चर्यचकित झाले. फलंदाजी करणारा प्रभात जयसूर्या या चेंडूकडे पाहतच राहिला. चेंडू हवेत इतका फिरला की जवळजवळ टर्फच्या मध्यभागी असलेला चेंडू खेळपट्टीच्या बाहेरील बाजूस आदळला. हा चेंडू पकडण्यासाठी यष्टीरक्षकालाही खूप दूर हात पसरावे लागले. खेळाडूंनी हवेत अनेक सूर मारलेले तुम्ही पाहिले असतील, पण असा स्विंग तुम्ही पहिल्यांदाच पाहिला असेल.

Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
ENG vs SL Joe Root sixth highest run scorer in Test cricket
ENG vs SL Test : जो रुटने कुमार संगकाराला मागे टाकत केला मोठा पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील सहावा खेळाडू
Mark Wood out for the year with an elbow injury
ENG vs SL : इंग्लंड संघाला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज मार्क वुड यंदा क्रिकेट खेळणार नाही; नेमकं काय आहे कारण?
PAK vs BAN Test Series Yasir Arafat on PCB
PAK vs BAN : पीसीबी म्हणजे एक सर्कस, त्यात अनेक जोकर भरलेत; माजी खेळाडूची कठोर शब्दात टीका
Joe root make most test runs at lords cricket ground
Joe root : जो रूटने क्रिकेटच्या पंढरीत केला मोठा पराक्रम! सर्व फलंदाजांना मागे टाकत लॉर्ड्सवर केली खास कामगिरी

केन विल्यमसन आणि हेन्री निकोल्स यांनी द्विशतके झळकावली

या दुसऱ्या कसोटीत हेन्री निकोल्स आणि केन विल्यमसन यांनी न्यूझीलंडकडून द्विशतके झळकावली. विल्यमसनने २१५ आणि हेन्री निकोल्सने २०० धावा केल्या. विल्यमसनच्या खेळीत २३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याचवेळी हेन्री निकोल्सने १५ चौकार आणि ४ षटकार ठोकले. दोघांच्या शतकी खेळीमुळे न्यूझीलंडने ४ गडी गमावून ५८० धावांवर डाव घोषित केला आणि किवी संघाने फॉलोऑन घेत सामना जिंकला.

करुणारत्नेने कर्णधारपद सोडण्याचा घेतला निर्णय

मी अजूनही श्रीलंकेच्या निवड समितीच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे, असे न्यूझीलंडविरुद्धच्या विद्यमान कसोटी मालिकेसाठीचा कर्णधार आणि फलंदाज म्हणाला की, “पण मला विश्वास आहे की जर श्रीलंकेला नवा कर्णधार मिळाला तर ते नवीन WTC सायकलसाठी चांगले होईल.” करुणारत्नेच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या संघाचा न्यूझीलंडच्या दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दारुण पराभव झाला. क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्याचा १ धावाने पराभव झाला.

हेही वाचा: WPL 2023, GGW vs UPW: यूपीच्या विजयाने गुजरातसह बंगळुरूच्या आशा मावळल्या, जायंट्सवर तीन विकेट्सने मात

वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा संघ एक डाव आणि ५८ धावांनी पराभूत झाला. मात्र, ज्या मालिकेत करुणारत्नेची कॅप्टन्सीमध्ये फेल झाला, पण त्याच मालिकेत त्याची फलंदाजी जबरदस्त होती. तो श्रीलंका संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने दोन कसोटीच्या ४ डावात २०४ धावा केल्या, ज्यामध्ये सर्वोत्तम ८९ धावसंख्या होती. आता श्रीलंकेला आयर्लंडविरुद्ध मालिका खेळायची आहे. मायदेशातील या दोन सामन्यांच्या मालिकेनंतर करुणारत्नेने कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.