PBKS vs KKR : मोहालीत कोलकाता नाईट रायडर्स पंजाब किंग्जशी भिडणार; ‘अशी’ असेल दोन्ही संघांची प्लेईंग XI

IPL 2023 Punjab Kings vs Kolkata Knight Riders : मोहालीत ब्रिंद्रा स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे.

IPL 2023 PBKS vs KKR Match
पंजाब किंग्स वि कोलकाता नाइट रायडर्स मॅच अपडेट्स

IPL 2023, PBKS vs KKR Cricket Update : आयपीएलच्या १६ व्या हंगामाला कालपासून सुरुवात झाली असून आज मोहालीत ब्रिंद्रा स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. आजच्या या सामन्यात पाऊस खोडा घालण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोहालीची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असेल, पण पावसाच्या सरी कोसळल्या तर परिस्थिती बदलू शकते.

आज आयपीएलचा पहिला डबल हेडर सामना होणार आहे. पंजाब आणि कोलकाता या दोन्ही संघांच्या आजपर्यंतच्या कामगिरीत चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. मागील लीगमध्ये पंजाबचा संघ दहा संघांच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर तर कोलकाताचा संघ सातव्या स्थानावर होता. आयपीएलच्या या नवीन हंगामात दोन्ही संघ नवीन कर्णधारासोबत मैदानात उतरणार आहेत. शिखर धवन पंजाबचं नेतृत्व करणार आहे, तर नीतीश राणाकडे केकेआरच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.

मैदानात पाऊस पडण्याची शक्यता

मोहालीत होणाऱ्या पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्यात पाऊस कोसळण्याची ५० टक्के शक्यता आहे. मोहालीत ढगाळ वातावरण असल्याने काल जोरदार पाऊस कोसळला होता. मोहालीची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असेल. पावसाने सामन्यात खोडा घातल्यास परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा – सुनील गावसकरांना रश्मिका मंदानाच्या डान्सची पडली भुरळ, कॉमेंट्री बॉक्समध्येच लगावले ठुमके, Video झाला व्हायरल

नाणेफेकीच्या आधारावर दोन्ही संघांची प्लेईंग-११; इॅम्पॅक्ट प्लेयर कोण असेल?

पंजाबने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यास संभाव्य प्लेईंग-११ काय असेल?
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), सिकंदर रजा, शाहरुख खान, सॅम करन, ऋषी धवन, हरप्रीत बराड, राहुल चहर, अर्शदीप सिंग

जर पंजाबच्या संघाने प्रथम फलंदाजी केली, तर फक्त तीन विदेशी खेळाडूंना निवडू शकतात. यामध्ये भानुका राजपक्षे, सिकंदर रजा आणि सॅम करन यांचा समावेश असू शकतो. दुसऱ्या इनिंगमध्ये एलिसला राजपक्षेसाठी इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात खेळवू शकतात. जर पंजाबला पहिल्या इनिंगमध्ये अतिरिक्त फलंदाजाची आवश्यकता असल्यास, राज बावाला अशा खेळाडूच्या जागेवर आणू शकतात, जो पहिल्यांदाच बाद झालेला असेल. तसंच त्यांच्याकडे सहा गोलंदाजांचा विकल्प आहे.

पंजाबच्या संघाने प्रथम गोलंदाजी केल्यास प्लेईंग-११ कशी असेल?

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), सिकंदर रजा, शाहरुख खान, सॅम करन, ऋषी धवन, हरप्रीत बराड, राहुल चहर, नेथन एलिस, अर्शदीप सिंग

जर पंजाबने प्रथम गोलंदाजी केली, तर एलिस आणि चहरसाठी राजपक्षेला नंबर ३ वर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवला जाऊ शकतो. ज्यामुळे फलंदाजी मजबूत होऊन धावांचं लक्ष्य गाठता येईल.

नक्की वाचा – इम्रान खान यांची बीसीसीआयवर टीका, म्हणाले, “मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना…”

कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी केल्यास प्लेईंग ११ कशी असेल?

कोलकाता : एन जगदीशन, रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), व्येंकटेश अय्यर, नीतीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्यूसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती किंवा सुयश शर्मा.
कोलकाताच्या संघात अष्टपैलू खेळाडूंची संख्या जास्त असल्याने ते ८ नंबरपर्यंत फलंदाजी करु शकतात. त्यामुळे ते दुसऱ्या इनिंगमध्ये एक अतिरिक्त गोलंदाज खेळवण्याचा विचार करु शकतात.

कोलकाता संघाने प्रथम गोलंदाजी केल्यास प्लेईंग-११ कशी असेल?

एन जगदीशन (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, नीतीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, मनदीप सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकुर, सुनील नारायण, लॉकी फर्ग्यूसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती किंवा सुयश शर्मा

जर केकेआरने तीन विदेशी खेळाडूंची नावं घोषीत केली, तसंच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर ते दुसऱ्या इनिंगमध्ये रहमानुल्लाह गुरबाज किंवा डेविड वीजला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवू शकतात. जत त्यांना अतिरिक्त गोलंदाज खेळवायचा असेल, तर पहिल्या इनिंगमध्ये डेविडला खेळवण्याचा विचार करु शकतात.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 14:23 IST
Next Story
MS Dhoni Six: ‘माही मार रहा है!’, ४१ वर्षीय एमएस धोनीने दाखवली मसल पॉवर, शेवटच्या षटकात चाहत्यांच्या दिशेने ठोकला षटकार
Exit mobile version