MI vs LSG IPL 2023 Eliminator Highlights: आयपीएल २०२३च्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा सामना मुंबई इंडियन्सशी संपन्न झालाे. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना मुंबईने २० षटकांत ८ गडी गमावून १८२ धावा केल्या आणि मुंबईला १८३ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, लखनऊला केवळ १०१ धावाच करता आल्या. पलटणने तब्बल ८१ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपरजायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले आहे. आता शुक्रवारी मुंबईचा सामना गुजरातशी होणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने आठ गड्यांच्या मोबदल्यात १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ १६.३ षटकांत अवघ्या १०१ धावांवर गारद झाला. या सामन्यात मुंबईसाठी सर्व खेळाडूंनी फलंदाजी करत योगदान दिले. ग्रीनने सर्वाधिक ४१ धावा केल्या. त्याचवेळी लखनऊकडून नवीन-उल-हकने चार आणि यश ठाकूरने तीन बळी घेतले. मार्कस स्टॉयनिसने दुसऱ्या डावात लखनऊसाठी सर्वाधिक ४० धावा केल्या. मुंबईच्या आकाश मधवालने पाच बळी घेतले. या सामन्यातील पराभवाने लखनऊचे प्लेऑफमध्ये पहिला विजय मिळवण्याचे स्वप्न भंगले. या संघाने गेल्या वर्षी एलिमिनेटर सामनाही खेळला होता आणि त्यात पराभव झाला होता.

प्रत्युत्तरात लखनौचा संघ १६.३ षटकात १०१ धावांवर सर्वबाद झाला. २५ धावांच्या आतच संघाचे दोन्ही सलामीवीर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. इम्पॅक्ट खेळाडू काईल मेयर्स १८ धावा आणि प्रेरक मांकड ३ धावा करून बाद झाला. क्रुणाल पांड्यालाही मोठी खेळी खेळता आली नाही. तो अवघ्या ८ धावांवर बाद झाला. यानंतर आयुष बदोनीलाही संघासाठी मोठी खेळी करता आली नाही. तो केवळ १ धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. निकोलस पूरन गोल्डन डक बनला. लखनऊकडून धडाकेबाज खेळी करणारा मार्कस स्टॉयनिस धावबाद झाला. त्याने २७ चेंडूत सर्वाधिक ४० धावा केल्या. यानंतर कृष्णप्पा गौतमही धावबाद झाला. रवी बिश्नोईलाही काही विशेष कामगिरी करता आली नाही. तो अवघ्या 3 धावांवर बाद झाला. यानंतर दीपक हुडाही धावबाद झाला. १३ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने १५ धावा करून तो बाद झाला. यानंतर लखनऊच्या विकेट्स ठराविक अंतरानंतर विकेट्स पडत राहिल्या. मुंबईच्या आकाश मधवालने शानदार गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. आकाशने १.४२ च्या स्ट्राइक रेटने ३.३ षटकात केवळ ५ धावा देत सर्वाधिक ५ बळी घेतले.

Live Updates

Lucknow Super Giants vs Mumbai Indians Eliminator Highlights Cricket Match Updates: लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हायलाइट्स स्कोअर अपडेट्स

18:39 (IST) 24 May 2023
MI vs LSG Eliminator: गेल्या वेळी एलिमिनेटरमध्ये अडकले होते

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचे लक्ष आता सहाव्या आयपीएल विजेतेपदावर आहे. सुपर जायंट्स गेल्या मोसमात आरसीबीविरुद्ध केवळ एलिमिनेटरमध्ये पराभूत झाले होते आणि यावेळी संघाला त्यावर उभारी द्यायची आहे. नियमित कर्णधार लोकेश राहुलची अनुपस्थिती असूनही संघाचा समतोल कायम आहे आणि क्रुणाला पांड्याने उपलब्ध पर्यायांचा चांगला वापर केला आहे आणि आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघाविरुद्ध गती कायम ठेवण्याची आशा आहे. मुंबईसाठी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या अंतिम साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने शानदार शतक झळकावले.

18:12 (IST) 24 May 2023
MI vs LSG Eliminator: लखनऊला दुखापतींचे लागले आहे ग्रहण

लखनऊने गेल्यावर्षीही प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता; पण रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने त्यांचे आव्हान संपुष्टात आणले होते. लखनऊसाठी जमेची बाब म्हणजे नियमित कर्णधार के.एल. राहुलच्या अनुपस्थितीतही या संघाने कामगिरी उंचावली. श्रेय अर्थातच बदली कर्णधार क्रुणाला पांड्याच्या सुपीक डोक्याचे. क्रुणालाने हाताशी असलेल्या खेळाडूंचा हुशारीने वापर करून घेत, संघात चैतन्य फुंकले.

18:09 (IST) 24 May 2023
MI vs LSG Eliminator: मुंबईला गोलंदाजीत सुधारणा करण्याची गरज

दर्जेदार वेगवान गोलंदाजाची पोकळी मुंबईला यावर्षी सातत्याने जाणवत आहे. जसप्रीत बुमराह जायबंदी असल्याने ते सहाजिकच आहे; पण यावर तोडगा शोधणे या संघास जमलेच नाही. आतापर्यंतच्या वाटलाचील फलंदाजांच्या कामगिरीचा वाटा मोठा आहे. त्यामुळे मुंबईला जर आयपीएलच्या अंतिम फेरीत जायचे असेल तर त्यांना गोलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे.

18:00 (IST) 24 May 2023
MI vs LSG Eliminator: केवळ तीनदा एलिमिनेटर खेळून संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे

मात्र, हे केवळ तीन वेळा असे घडले आहे, जेव्हा प्लेऑफमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर असलेल्या संघांनी (२०११पासून) अंतिम फेरी गाठली होती. २०१६मध्ये सनरायझर्स हैदराबाद व्यतिरिक्त, २०१२मध्ये चेन्नई सुपर किंग्जने साखळी फेरीत चौथ्या स्थानावर राहून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर सीएसके संघ एलिमिनेटर (वि एमआय) आणि क्वालिफायर-२(वि. डीसी) जिंकण्यात यशस्वी झाला.

मात्र, अंतिम फेरीत केकेआरने सीएसकेचा पराभव केला. त्याच वेळी, २०२१ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या संघानेही असेच केले होते. त्यानंतर केकेआरने एलिमिनेटरमध्ये RCB आणि क्वालिफायर-२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. मात्र, चेन्नई सुपर किंग्जने फायनलमध्ये केकेआरचा पराभव केला.

17:43 (IST) 24 May 2023
MI vs LSG Eliminator: एलिमिनेटर जिंकून लखनऊ किंवा मुंबईला चॅम्पियन बनणे कठीण

२०११मध्ये क्वालिफायर आणि एलिमिनेटर फेऱ्या सुरू झाल्या. तेव्हापासून, १२ हंगामात असे फक्त एकदाच घडले आहे जेव्हा एखादा संघ एलिमिनेटर खेळून चॅम्पियन बनला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघ चॅम्पियन बनला तेव्हा २०१६ मध्ये हे घडले. याशिवाय, प्लेऑफ पद्धत सुरू झाल्यापासून तिस-या आणि चौथ्या क्रमांकाचा संघ कधीही चॅम्पियन बनला नाही.

17:41 (IST) 24 May 2023
MI vs LSG Eliminator: प्लेऑफ मध्ये आज मुंबई इंडियन्स करणार लखनऊ सुपर जायंट्सशी दोन हात

आयपीएल २०२३च्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होत आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकून दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरातचा सामना करायचा आहे. लखनऊचा संघ प्लेऑफ मध्ये फक्त दुसरा सामना खेळणार असून पहिला विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्याचवेळी मुंबईला प्लेऑफ मध्ये आपला
अप्रतिम विक्रम कायम ठेवायचा आहे.

Lucknow Super Giants vs Mumbai Indians Eliminator Highlights Cricket Match Updates: लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हायलाइट्स स्कोअर अपडेट्स

२०११मध्ये क्वालिफायर आणि एलिमिनेटर फेऱ्या सुरू झाल्या. तेव्हापासून, १२ हंगामात फक्त एकदाच एलिमिनेटर खेळून संघ चॅम्पियन झाला आहे. हे २०१६मध्ये घडले होते. आज मुंबई किंवा लखनऊ यांच्यापैकी कोणीतरी असे परत करून दाखवणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.