IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Highlights: आयपीएलमधील आजचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात कोलकातावर मुंबईने २४ धावांनी सहज विजय मिळवला. केकेआरने दिलेल्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचे फलंदाज केवळ १४५ धावा करत ऑल आऊट झाले. सूर्याने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर मिचेल स्टार्कने पुनरागमन करत ४ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. तर केकेआरकडून केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने ७० धावा आणि मनीष पांडेने ४२ धावांचे योगदान दिले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ६२ चेंडूत ८३ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. मुंबईच्या गोलंदाजांची चांगली कामगिरी विफल ठरली. मुंबईकडून तुषारा आणि बुमराहने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Live Score, IPL 2024 : मुंबई इंडियन्सला केकेआरविरूद्ध मोठ्या लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. केकेआऱने मुंबईच्या घरच्या मैदानावर १७० धावांच्या लक्ष्याचा बचाव केला.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्ण घेतला आहे. केकेआरचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार. मुंबईच्या संघात या सामन्यासाठी एकच बदल करण्यात आला आहे. मोहम्मद नबीच्या जागी नमन धीरचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेअरच्या यादीत ठेवण्यात आला आहे. आगामी टी-२० विश्वचषक पाहता रोहितला विश्रांती देण्यात येत आहे.
चालू हंगामात कोलकाता नाइट रायडर्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज हर्षित राणावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीच्या अभिषेक पोरेलवर विकेटवर आक्रमकपणे सेलिब्रेशन केल्याबद्दल एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. हर्षितने आतापर्यंत ११ विकेट घेतल्या आहेत.
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या गेल्या ५ सामन्यांमध्ये केकेआरने तीनदा विजय मिळवला आहे, तर मुंबईने दोनदा विजय मिळवला आहे.
IPL मध्ये मुंबई आणि कोलकाता यांच्यात एकूण ३२ सामने खेळवले गेले आहेत, ज्यामध्ये मुंबईने २३ सामने जिंकून वर्चस्व गाजवले आहे. तर KKR ने फक्त ९ सामने जिंकले आहेत.
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Highlights:आयपीएल २०२४ मधील ५१ वा सामना मुंबई इंडियन्स वि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात केकेआरने मुंबईवर १२ वर्षांनी विजय मिळवला.