MS Dhoni’s 5000 runs completed in IPL : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने सोमवारी आयपीएलमध्ये मोठा इतिहास रचला. धोनीने पाच हजार धावांचा टप्पा पार केला आहे. आयपीएलमध्ये यष्टिरक्षक म्हणून पाच हजार धावा करणारा तो पहिला खेळाडू आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध चेपॉक स्टेडियमवर ३ चेंडूत १२ धावांच्या खेळीत त्याने ही कामगिरी केली. धोनी फलंदाजीला आला तेव्हा हा पल्ला गाठण्यासाठी त्याला फक्त ८ धावांची गरज होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धोनीने आयपीएलमध्ये २३६ सामन्यांमध्ये ३९.०९ च्या सरासरीने आणि १३५.५४ च्या स्ट्राइक रेटने ५००४ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात ५००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा धोनी हा सातवा फलंदाज आहे. त्याच्याआधी विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि एबी डिव्हिलियर्स यांनी ही कामगिरी केली आहे. कोहली या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने २२४ सामन्यात ६७०६ धावा केल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ शिखर धवनचा क्रमांक लागतो, ज्याने २०७ सामन्यात ६२८३ धावा केल्या आहेत.

धोनी ब्रिगेड चार वर्षांनंतर सामना खेळण्यासाठी चेपॉक येथे उतरली होती. २० व्या षटकात धोनी फलंदाजीसाठी आला, तेव्हा चेन्नईचे चाहते चांगलेच उत्साहित झाले. धोनीनेही सीएसके चाहत्यांना निराश केले नाही. त्याने येताच वुडविरुद्ध लागोपाठ दोन चेंडूंत षटकार ठोकले. मात्र, ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर धोनी बाद झाला. धोनीचे दोन षटकार पाहून चाहते खूश झाले.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –

१. विराट कोहली – ६७०६
२. शिखर धवन – ६२८४
३. डेव्हिड वॉर्नर – ५९३७
४. रोहित शर्मा – ५८८०
५. सुरेश रैना – ५५२८

हेही वाचा – IPL 2023 CSK vs LSG: झिरो ते हिरो; तुषार देशपांडेनं केलं धोनीनं दिलेल्या संधीचं सोनं

सामन्याबद्दल बोलायचे, तर आयपीएलच्या सहाव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपर जायंट्सचा १२ धावांनी पराभव केला. चेन्नईचा मोसमातील हा पहिला विजय ठरला. गेल्या सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. घरच्या मैदानावर एमए चिदंबरम स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ २० षटकांत सात गडी गमावून २०५ धावाच करू शकला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni became the seventh player to cross the 5000 runs mark in ipl vbm