चेन्नई सुपर किंग्सचा संघ यंदा दुखापतींतून जात आहे. दुखापतींमुळे संघाचे अनेक खेळाडू बाहेर झाले आहेत. ज्याचा फटका संघाला बसत आहे. धरमशाला येथे पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात संघाची फलंदाजी बाजू ढासळताना दिसली. १६व्या षटकाच्या अखेरीस चेन्नई सुपर किंग्जने १२२ धावांवर सहावी विकेट गमावली तेव्हा धोनी फलंदाजीला येईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. पण धोनी उशिरा फलंदाजीला आल्याने त्याच्यावर टीका होत आहे. अनेक क्रिकेट दिग्गज तसेच समालोचक त्याच्यावर टीका करताना दिसले. पण आता धोनीने उशिरा फलंदाजीला येण्याचे एक मोठे कारण समोर आले आहे.
धोनी यंदा अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजी करताना तुफान फॉर्मात आहे. पण धोनी इतका उशिरा फलंदाजीला का येतो, यावरून खूपच चर्चा रंगली आहे. पंजाबविरूद्धच्या सामन्यातही धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. धोनी नवव्या क्रमांकावर उतरला. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच माही इतक्या खालच्या स्तरावर फलंदाजीला आला होता, त्यानंतर त्याच्या निर्णयावर टीका होऊ लागली. पण टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार धोनीला दुखापत झाली आहे आणि तसे असतानाही सामना खेळत आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्जमधील एका सूत्राने सांगितले की, माजी कर्णधार संपूर्ण आयपीएलमध्ये हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीसह खेळत आहे आणि त्यामुळे फार वेळ धावणं त्याच्या दुखापतीसाठी अधिक घातक ठरू शकतं. आयपीएलच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये धोनीच्या पायाचे स्नायू फाटले. धोनी यामुळे आयपीएल २०२४ मधून ब्रेकही घेणार होता. पण जेव्हा संघाचा दुसरा यष्टीरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवे दुखापतीमुळे आयपीएल खेळण्यासाठी भारतात येऊ शकत नसल्याने माहीला स्वत:ला ब्रेक देण्याचा विचार काढून टाकावा लागला. धोनीला वेदना असूनही औषधे घेऊन खेळावे लागत आहे आणि कमी धावण्याचा प्रयत्न करावा लागतो, अशी परिस्थिती आहे.
सूत्राने सांगितले की, ‘आम्ही आमच्या ‘बी’ संघासोबत खेळत आहोत. जे लोक धोनीवर टीका करत आहेत त्यांना माहितही नाही की तो या संघासाठी किती त्याग करत आहे. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे पण यष्टीरक्षक-फलंदाजाकडे दुसरा पर्याय नाही कारण दुखापतींमुळे संघ आधीच कमकुवत झाला आहे. सरावादरम्यान धोनी अजिबात धावत नाही आणि त्याची संपूर्ण तयारी मोठे फटके खेळण्याची आहे. नवीन कर्णधार ऋतुराज गायकवाडसाठी तो मार्गदर्शक ठरला आहे, ज्याने चांगली कामगिरी केली. वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना आणि दीपक चहर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाले आहेत.
धोनी गेल्यावर्षीच्या आयपीएलमध्ये गुडघ्याच्या दुखापतीसह खेळला होता. आयपीएलचे जेतेपद मिळवल्यानंतर लगेचच धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गुडघ्याच्या दुखापतीतून धोनी सावरला असला तरी ही पायाची दुखापत त्याच्यासाठी यंदाच्या मोसमात अधिक त्रासदायक ठरत आहे.