MS Dhoni praises Mathisha Pathirana: आयपीएल २०२३ मध्ये शनिवारी (६ मे) चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चेपॉक स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात सीएसकेने एमआयवर ६ गडी राखून मात केली. सीएसकेकडून या सामन्यात मथीशा पाथिरानाने महत्वाची भूमिका बजावली. त्याने ४ षटकात केवळ १५ धावा देत ३ बळी घेतले. त्यामुळे येथील ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून पाथीरानाची निवड करण्यात आली. सामना संपल्यानंतर कर्णधार धोनीने पाथिरानाची स्तुती करताना खास टिप्पणी केली. एमएस धोनीने म्हणाला, या गोलंदाजावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. धोनीने हे शेवटचे का सांगितले, त्यामागचे कारणही सांगितले.
धोनी म्हणाला, “तो (मथीशा) किती क्रिकेट खेळतोय यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. माझा विश्वास आहे की, तो अशा प्रकारचा खेळाडू नाही, ज्याने अधिक कसोटी क्रिकेट खेळावे. मला वाटते की त्याने वनडे फॉरमॅटही कमी खेळावे. होय, पण या (टी-२०)फॉरमॅटमध्ये त्याने आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा खेळल्या पाहिजेत. तो असा गोलंदाज आहे, ज्याचा विशेष प्रसंगी वापर केला जाऊ शकतो. यासाठी, तो तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे आणि जेव्हा जेव्हा आयसीसी स्पर्धा होतात तेव्हा त्यांच्यासाठी तो उपलब्ध असावा. तो श्रीलंकेसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो.”
हेही वाचा – DC vs RCB: सलग तीन चेंडूंवर षटकार-चौकार मारल्याने सॉल्टवर भडकला सिराज; सामन्यानंतर मारली मिठी, पाहा VIDEO
पाथिराना ‘ज्युनियर मलिंगा’ म्हणून ओळखला जातो –
धोनीने बहुधा पाथिरानाच्या गोलंदाजीवर लक्ष ठेवा असे म्हटले आहे. पाथिराना काहीसा लसिथ मलिंगासारखा गोलंदाजी करतो. त्याला ‘ज्युनियर मलिंगा’ असेही म्हणतात. अशा प्रकारच्या बॉलिंग अॅक्शनसह अधिक क्रिकेट खेळणे हे गोलंदाजासाठी दुखापतीचे प्रमुख कारण बनू शकते. कदाचित त्यामुळेच धोनीने त्याला फक्त मोठ्या स्पर्धा खेळण्याचा सल्ला दिला असेल.
हेही वाचा – ODI WC 2023: “जर भारताने ‘ही’ लेखी हमी दिली, तर आम्ही भारतात येऊ”; पाकिस्तानची भारतासमोर मोठी अट
बदली खेळाडू म्हणून सीएसकेमध्ये सामील झाला होता –
चेन्नई सुपर किंग्जसाठी या मोसमात पाथिराना अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मागील वर्षी बदली खेळाडू म्हणून पाथीरानाचा सीएसके संघात समावेश करण्यात आला होता. आयपीएल २०२२ मध्ये त्याला फक्त काही संधी मिळाल्या, परंतु यावेळी एमएस धोनी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सतत स्थान देत आहे.