Rohit Sharma Statement About Jasprit Bumrah : मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधात ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. बंगळुरुच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत सामना खिशात घातला. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने मुंबई इंडियन्सला मोठा फटका बसला आहे, अशी चर्चा आहे. जसप्रीत बुमराह यंदाचं आयपीएल हंगाम खेळणार नसल्याने नवीन गोलंदाजांना संधी मिळाली. जोफ्रा आर्चरची एन्ट्री झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, आरसीबीविरोधा जोफ्राची गोलंदाजीही सपशेल फोल ठरली. विराटने जोफ्राच्या गोलंदाजीवर आक्रमक फलंदाजी केली. आरसीबीने जोफ्राच्या चार षटकांत ३३ धावा कुटल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने जसप्रीत बुमराहबाबत प्रतिक्रिया दिली. रोहितने सामन्यात पराभव झाल्यानंतर म्हटलं, ” अजून ३०-४० धावा जास्त झाल्या असत्या तर सामन्याचं चित्र वेगळं असतं. मागील सहा ते आठ महिन्यांपासून जसप्रीत बुमराहशिवाय खेळावं लागत आहे. बुमराहचं नसणं ही एक वेगळी गोष्ट आहे, पण कुणाला तरी पुढे येऊन चांगली कामगिरी करावी लागते. आपण त्या गोष्टींवर कायम राहू शकत नाहीत. दुखापत होणं आपल्या नियंत्रणात नसतं. आपण अशा गोष्टींमध्ये जास्त काही करु शकत नाही. सेटअपमध्ये दुसरे खेळाडूही प्रतिभावंत असतात. आम्ही त्यांना समर्थन दिलं पाहिजे. सीजनचा पहिला सामना होता. आम्ही काही चूका केल्या आहेत. इथून आता पुढे जाण्याची आवश्यकता आहे.

नक्की वाचा – IPL 2023: मैदानात ‘हेलिकॉप्टर शॉट’ची उत्तुंग भरारी; ‘या’ खेळाडूला टीम इंडियात घेण्याची मागणी, पाहा Video

मुंबई इंडियन्सविरोधात विराट कोहली चमकला

रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरने आतापर्यंत आयपीएलचा किताब जिंकला नाही. पण त्यांचा स्टार फलंदाज विराट कोहलीचं म्हणणं आहे की, आरसीबीने नेहमी त्यांच्या कामगिरीत सातत्य ठेवलं आहे. यावेळी ट्रॉफी जिंकण्यासाठी या गोष्टी अमलात आणणे गरजेचे आहे. ८२ धावांच्या नाबाद खेळीमुळं आरसीबीने मुंबई इंडियन्सचा ८ विकेट्सने पराभव केला, यावर बोलताना विराट म्हणाला, हा अभूतपूर्व विजय आहे. आम्ही खूप वर्षानंतर घरेलू मैदानावर सामना खेळला. आम्ही ज्या पद्धतीने प्रदर्शन केलं, ते पाहून मला आनंद झाला.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai indians skipper rohit sharma gives big statement about jasprit bumrah in press conference mi vs rcb nss