Mustafizur Rahman Available For Match Against Punjab : आयपीएल २०२४ मधील २९वा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा २० धावांनी सामना जिंकला. अशा प्रकारे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघ चेन्नई सुपर किंग्ज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ६ पैकी ४ सामने जिंकून संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, गतविजेत्या संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान १ मे रोजी चेन्नई सुपर किंग्जच्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेन्नईसाठी आनंदाची बातमी –

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगसाठी त्याची रजा एका दिवसाने वाढवली आहे. या डावखुऱ्या गोलंदाजाने सीएसकेकडून ५ सामन्यात १० विकेट्स घेऊन चमकदार कामगिरी केली आहे. बीसीबीने यापूर्वी मुस्तफिझूरला ३० एप्रिलपर्यंत आयपीएलसाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) जारी केले होते, परंतु बोर्डाने आता त्याच्या फ्रँचायझीसाठी आणखी एक सामना खेळण्यासाठी त्याला आणखी एक दिवस राहण्याची परवानगी दिली आहे.

मुस्तफिझूर ३० एप्रिलनंतर परतणार होता मायदेशी –

सोमवारी क्रिकबझला या प्रकरणाची माहिती देताना बीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “मुस्तफिझूर ३० एप्रिलनंतर परतणार होता, पण आता आम्ही त्याला १ मे रोजीच्या सामन्यासाठी थांबण्याची परवानगी दिली आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी तो २ मे रोजी (३ ते १२ मे) येण्याची अपेक्षा आहे. यानंतर आम्ही त्याला नंतर सोडण्यास तयार नाही. कारण आम्हाला त्याला विश्वचषकापूर्वी काही दिवसांची विश्रांती द्यायची आहे.”

हेही वाचा – IPL 2024 : रोहित शर्मासह ‘या’ पाच सर्वात वयस्कर खेळाडूंनी आयपीएलमध्ये झळकावलयं शतक, जाणून घ्या कोण आहेत?

बांगलादेशने अमेरिकेत फक्त २ टी-२० सामने खेळलेत –

अमेरिकेतील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी बांगलादेशला २१ ते २५ मे दरम्यान अमेरिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकात त्याला अमेरिकेत ग्रुप स्टेजमध्ये ४ पैकी २ सामने खेळायचे आहेत. याआधी बांगलादेशने अमेरिकेत फक्त दोन टी-२० सामने खेळले आहेत. २०१८ मध्ये, फ्लोरिडामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध सामने खेळले गेले होते.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mustafizur rahman available for csk vs pbks fixture bcb extended leave for ipl 2024 vbm