IPL 2025 Nicholas Pooran Video Marathi MI vs LSG: मुंबई इंडियन्स आयपीएल २०२५ मध्ये आपल्या जुन्या अंदाजात परतली आहे. पराभवांचा सिलसिला संपवत मुंबईने सलग तीन सामने जिंकत गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. मुंबई इंडियन्स आता सलग चौथ्या विजयानंतर गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. आता मुंबईचा संघ सलग पाचवा विजय मिळवण्यासाठी पुढचा सामना वानखेडेच्या मैदानावर खेळणार आहे.
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडिमयवर दुपारी खेळवला जाणार आहे. या सामन्याकरता लखनौचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतरचा निकोलस पुरनचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.
निकोलस पुरन आणि संघ मुंबईतील एअरपोर्टवरचा एक व्हीडिओ समोर आहे. पुरनबरोबर अर्शीन कुलकर्णी जो मुंबईकर आहे. अर्शीने पुरनला महाराष्ट्र शब्द बोलायला शिकवला. पुरननेही नीट शिकून घेत तो मोठ्याने जय महाराष्ट्र बोलला. लखनौने कसं काय मुंबई असं कॅप्शन देत हा व्हीडिओ शेअर केला आहे.
निकोलस पुरनचे अनेक व्हीडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये हिंदी गाणी बोलताना दिसत आहे. तेरे संग यारा हे हिंदी गाणं तो अगदी सहज म्हणतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यानंतर तो आवेश खानच्या आईची हिंदीत बोलत समजूत काढताना दिसला, ज्या आवेशची कामगिरी पाहून भावुक झाल्या होत्या. आता निकोलस पुरन मराठीत बोलतानाचा व्हीडिओ समोर आला आहे.
आयपीएल २०२५ मध्ये ३७७ धावांसह, वेस्ट इंडिजचा हा फलंदाज या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून दुसऱ्या स्थानी आहे. डावखुऱ्या या फलंदाजाने २०४.८९ च्या स्ट्राईक रेटने आणि ४७.१२ च्या सरासरीने चार अर्धशतकं झळकावली आहेत. पण, पूरनला गेल्या तीन सामन्यांमध्ये फक्त २८ धावा करता आल्या आहेत आणि लवकर बाद झाला.
सुपर जायंट्सने एकाना इंटरनॅशनल स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. त्यामुळे आगामी सामन्यात मुंबई या पराभवाचा बदला घेणार का यावर सर्वांच्या नजरा आहेत. रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या गेल्या दोन सामन्यांमध्ये जलद अर्धशतकं झळकावत आपला फॉर्म मिळवला आहे. यासह मुंबईचा संघ चांगलाच फॉर्मात आला आहे.