Virender Sehwag On Gujrat Titans Trump Card Player : गुजरात टायटन्स आयपीएल २०२३ मध्ये अप्रतिम कामगिरी करून प्ले ऑफमध्ये सर्वात आधी प्रवेश करणारा संघ ठरला. गुजरातच्या संघाकडून शुबमन गिलने धडाकेबाज फलंदाजी करून अनेकदा संघाला विजय मिळवून दिला. याच कारणामुळं गिल गुजरातचा महत्वाचा खेळाडू बनला आहे. परंतु, टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने सीएसकेविरोधात होणाऱ्या पहिल्या क्वालिफायर सामन्याआधी गुजरातच्या ट्र्म्प कार्डबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सेहवाग म्हणाला, “शुबमन गिलने चमकदार कामगिरी केलीय, पण गुजरातचा खरा ट्रंप कार्ड आहे राशिद खान. जेव्हा गुजरातला विकेट्सची गरज असते, तेव्हा कर्णधार पांड्या राशिदला गोलंदाजी करण्यासाठी सांगतो आणि राशिद विकेट्स घेण्यात यशस्वी होतो. भागिदारी मोडण्यातही राशिद यशस्वी झाला आहे. याच कारणास्तव राशिद यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. राशिद खान गुजरात टायटन्सचा खरा ट्रंप कार्ड आहे, असं मला वाटतं.”

नक्की वाचा – WTC फायनलसाठी टीम इंडिया सज्ज, अनेक खेळाडू इंग्लंडला रवाना, पण ‘हे’ दिग्गज अजूनही भारतात, कारण…

सेहवाग पुढं बोलताना म्हणाला, क्वालिफायर सामन्यात राशिद खान गुजरातसाठी महत्वाचा खेळाडू आहे. सीएसके आणि गुजरातचा सामना चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. या खेळपट्टीवर फिरकीपटूंनी कमाल केली आहे. राशिदही या सामन्यात सीएसकेविरोधात गोलंदाजीचा जलवा दाखवण्यात यशस्वी होईल, अशी आशा आहे. राशिदने आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत २४ विकेट्स घेतल्या आहेत. तर शुबमन गिल दोन शतक ठोकण्यात यशस्वी झाला आहे.