RCB Unbox 2023: “कोहली अहंकारी, गर्विष्ठ… मला तो आवडत नाही”; डिव्हिलियर्सला विराटसोबतची पहिली भेट आठवली

RCB Unbox 2023: बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर नुकत्याच संपन्न झालेल्या आरसीबी अनबॉक्स २०२३ दरम्यान दोन्ही फलंदाज पुन्हा भेटले.

RCB Unbox 2023: Kohli arrogant I don't like him AB De Villiers remembers his first impression of Virat
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

RCB Unbox 2023: आयपीएलमध्ये विराट कोहलीसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. विराट त्याला पहिल्या भेटीत कसा वाटत होता आणि तो मूळ स्वभाव मात्र वेगळा निघाला यावर डिव्हिलियर्सने भाष्य केले आहे. त्याने सांगितले की, “२०११ मध्ये जेव्हा तो पहिल्यांदा विराटला भेटला तेव्हा त्याला भारतीय फलंदाज अहंकारी वाटला होता.”

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये आरसीबीसाठी एकत्र खेळले आहेत आणि दोन्ही खेळाडूंमध्ये एक अनोखा बंध आहे. दोन्ही दिग्गजांमध्ये खूप चांगली मैत्री आहे. आरसीबीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये माजी फ्रँचायझी फलंदाज ख्रिस गेल डिव्हिलियर्सशी कोहलीसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल बोलत आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या माजी फलंदाजाने सांगितले की, “जीवनातील चढ-उतारांमुळे कोहली खूप शांत झाला आहे.”

विराट कोहली मला आधी गर्विष्ठ, अहंकारी वाटत होता – डिव्हिलियर्स

मात्र, जेव्हा कोहली आणि डिव्हिलियर्स पहिल्यांदा आमनेसामने आले तेव्हा आफ्रिकन फलंदाजाला कोहलीची चांगली छाप पडली नाही. एबी डिव्हिलियर्स म्हणाला, “मी या प्रश्नाचे उत्तर यापूर्वीही दिले आहे. माझ्या मते जेव्हा मी विराट कोहलीला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तो थोडा अहंकारी आणि गर्विष्ठ होता. मात्र जेव्हा मी त्याला थोडे चांगले ओळखायला लागलो, आमच्यात मैत्री होत गेली त्यानंतर मला आदर वाटलायला लागला. त्याच्यासोबत खेळताना त्याच्यातील स्वभाव मला आणखी उलगडत गेला. माझ्या म्हणण्यानुसार जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तो कोणत्या ना कोणत्या अडथळ्याने बांधला गेला होता पण जेव्हा तो अडथळा तुटला तेव्हा मला त्याला एक माणूस म्हणून अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची संधी मिळाली. माझे पहिले संस्कार हे होते की त्याने थोडे जमिनीवर राहावे. तो खरच जमिनीवर असणारा खेळाडू आहे.”

हेही वाचा: IPL2023: भारत जगज्जेता बनवणारा गोलंदाज राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात दाखल, प्रसिद्ध कृष्णाची घेणार जागा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्सच्या सन्मानार्थ ‘RCB अनबॉक्स’ नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. बंगळुरूच्या घरच्या मैदानावर, एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा कार्यक्रम पार पडला, ज्याने हजारो प्रेक्षकांना आकर्षित केले. यादरम्यान एबी आणि गेल यांना हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले आणि त्यांचे जर्सी क्रमांकही निवृत्त करण्यात आले. आयपीएल २०२३ मध्ये बंगळुरूला ०२ एप्रिल रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 16:19 IST
Next Story
IPL2023: भारत जगज्जेता बनवणारा गोलंदाज राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात दाखल, प्रसिद्ध कृष्णाची घेणार जागा
Exit mobile version