Rishabh Pant may go for higher than Rs 25 crore : रविवारी जेद्दाह येथे होणाऱ्या आयपीएल मेगा लिलावात यष्टीरक्षक फलंदाज सुरेश रैनाला २५ कोटींहून अधिक बोली लागू शकते, असा विश्वास भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना यांनी व्यक्त केला आहे. कारण त्याच्या ‘एक्स फॅक्टर’चा विचार केल्यास त्याच्यासाठी संघांमध्ये चढाओढ पाहिला मिळणार होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ पूर्वी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर २४.७५ कोटी रुपये खर्च केले होते, जी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम आहे. यावेळी हा विक्रम मोडला जाईल, असा विश्वास सुरेश रैनाने व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऋषभ पंतला मिळू शकते २५ कोटींहून अधिक रक्कम –

जिओ स्टारवर सुरेश रैना म्हणाला, ‘फलंदाजी आणि यष्टीरक्षणाव्यतिरिक्त तो संघात एक्स फॅक्टर आणतो. त्यामुळे कोणताही मालक किंवा प्रशिक्षक याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.’ पंतला २५ कोटींपेक्षा जास्त किंमतीत विकले जाऊ शकते का, असे विचारले असता रैना म्हणाला, ‘मला त्याहून अधिक वाटते. पंजाब, दिल्ली, केकेआर आणि आरसीबीकडे पैसा आहे. त्याला लिलावात २५ कोटीहून अधिक रुपये मिळू शकतात.’

आयपीएल २०२५ च्या महालिलावापूर्वी मोठं भाकीत –

ऋषभ पंतची मैदानावरील उर्जा आणि त्याचा खेळाडूंशी असलेला संबंध पाहून चेन्नई सुपर किंग्जकडून चार वेळा आयपीएल जिंकणारा रैना म्हणाला, ‘त्याच्याकडे ताकद आहे आणि त्याचे खेळाडूंशी अप्रतिम संबंध आहेत. प्रत्येकाला त्याच्या कर्णधारपदाखाली खेळायचे असते आणि हेच त्याला खास बनवते.’

हेही वाचा – Irfan Pathan : जेवढ्या वेळात माझ्या बायकोचा मूड बदलतो, त्यापेक्षा कमी वेळात खेळपट्टीचा नूर पालटला; इरफानने उडवली रेवडी

u

‘आरसीबी किंवा केकेआर त्याला खरेदी करु शकतात’ –

सुरेश रैना पुढे म्हणाला, ‘हा लिलाव तीन वर्षांसाठी होत आहे. त्यामुळे ऋषभ पंत एक किंवा दोन नव्हे, तर तीन वर्षांसाठी मिळणार आहे. चेन्नईकडे तेवढे बजेट नाही, पण आरसीबी किंवा केकेआर त्याला खरेदी करू शकतात. तो केकेआरमध्ये गेल्यास अनेक चाहते संघाशी जोडले जातील.’

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant may go for higher than rs 25 crore suresh raina big prediction ahead ipl 2025 mega auction vbm