Rajasthan Royals vs Gujarat Titans: आयपीएलच्या १६व्या मोसमातील २३वा साखळी सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थान संघाने शानदार कामगिरी करत ३ विकेट्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने सुरुवातीलाच वृद्धीमान साहाच्या विकेटच्या रूपाने गुजरात संघाला मोठा धक्का दिला. त्याचा झेल घेण्यासाठी तीन खेळाडू धावले, तर शेवटी चौथ्या खेळडूने झेल पकडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि अशा स्थितीत तीन खेळाडू झेलसाठी आले होते, त्यात संजू सॅमसनचा देखील सहभाग होता. संजू सॅमसन व्यतिरिक्त शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांचाही समावेश होता, जे झेल घेणार होते. मोठ्या संख्येने प्रेक्षकांच्या आवाजामुळे, तिघांनाही एकमेकांची हाक ऐकू आली नाही आणि त्यामुळे त्यांची चूक झाली. हे तिघेही वेगवेगळ्या पोझिशनमध्ये झेल घेण्यासाठी चेंडूच्या खाली होते, पण तो झेल दुसऱ्याने पकडला. साहाचा हा झेल संजू सॅमसनच्या ग्लोव्हजमध्ये आला, पण धक्का लागल्याने तो ग्लोव्हजमधून बाहेर पडला. समोर उभा ट्रेंट बोल्ट उभा होता, ज्याने आरामात हा झेल पकडला.

ट्रेंट बोल्टचे चेंडूकडे होते लक्ष –

सॅमसन, हेटमायर आणि जुरेल यांनी गोंधळ निर्माण केला होता, परंतु ट्रेंट बोल्टचे चेंडूकडे लक्ष होते. त्यामुळे त्याने हा झेल सहज टिपला. वृद्धीमान साहा ३ चेंडूत ४ धावा करून बाद झाला. त्यामुळे गुजरात टायटन्सला पहिला धक्का बसला. पाहिलं तर हा झेल ट्रेंट बोल्टचाही होता, पण त्याने पाहिलं की संजू सॅमसन ग्लोव्हज घालून चेंडूच्या खाली येत होता, म्हणून त्याने झेल न घेण्याचं ठरवलं, पण हेटमायर आणि ज्युरेलने काही न पाहताच झेल घेण्यासाठी पुढे सरसावले. या घटनेचा व्हिडिओ आयपीएलने शेअर केला आहे.

हेही वाचा – IPL 2023 RR vs GT: राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हार्दिकने गमावला संयम; संजू सॅमसनला खुन्नस देत म्हणाला…, पाहा VIDEO

हेटमायरने राजस्थानला विजय मिळवून दिला –

या सामन्यात गुजरात टायटन्सने २० षटकांत ७ गडी गमावून १७७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १९.२ षटकांत सात गडी गमावून १७९ धावा करून सामना जिंकला. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक ६० धावा केल्या. त्याने ३२ चेंडूंच्या खेळीत तीन चौकार आणि सहा षटकार मारले. शिमरॉन हेटमायरने २६ चेंडूत नाबाद ५६ धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि पाच षटकार मारले.देवदत्त पडिक्कलने २५ चेंडूत २६ धावा केल्या. ध्रुव जुरेलने १० चेंडूत १८ आणि रविचंद्रन अश्विनने तीन चेंडूत १० धावा करत राजस्थानला विजयाच्या जवळ नेले. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या तीन षटकात ३६ धावा करायच्या होत्या. हेटमायर, जुरेल आणि अश्विन यांनी मिळून संघाला विजय मिळवून दिला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanju samson trent boult shimron hetmyer and dhruv jurrell rush to catch the aging saha watch video vbm