Sunil Gavaskar Statement On KKR Player : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ९ वा सामना गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाला. या सामन्यात कोलकाताने आरसीबीचा दारुण पराभव केला. पण सामना संपल्यानंतर खेळाडूंच्या प्रदर्शनाबाबत जोरदार चर्चा झाली. केकेआरने सामन्यात दणदणीत विजय मिळवला. पण भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी कोलकाताचा नंबर ३ चा फलंदाज मनदीप सिंगवर नाराजी व्यक्त केली. मनदीप सिंग शून्यावर बाद झाला आणि पुन्हा एकदा मागील सीजनप्रमाणे या लीगमध्येही मनदीपने निराशाजनक कामगिरी केली. सुनील गावसकर यांनी केकेआरचा फलंदाज मनदीप सिंगबद्दल बोलताना म्हटलं, तो नेहमी एक फ्रॅंचायजी शोधतो पण त्याने खूप काही केलेलं नाहीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केकेआरचा धाकड फलंदाज गुरुबाज आमि शार्दुल ठाकूरने चौफेर फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी केली. शार्दुलने आरसीबीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. केकेआरने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ विकेट्स गमावत २०४ धावा केल्या. परंतु, या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या फलंदाजांची केकेआरच्या गोलंदाजांनी पुरती दाणादाण उडवली. त्यामुळे आरसीबीचा आख्खा संघ १२३ धावांवर गारद झाला आणि केकेआरने ८१ धावांनी सामना जिंकून या लीगच्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

नक्की वाचा – KKR vs RCB IPL 2023: ‘इम्पॅक्ट प्लेयर’ सुयश शर्मा चमकला! वरुणच्या फिरकीनं RCB ची उडवली दाणादाण; कोलकाताचा दणदणीत विजय

विराट कोहलीने २१ आणि फाफ डु प्लेसिसने २३ धावा करत आरसीबीला चांगली सुरुवात दिली होती. कोहलीने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. परंतु, विराट आणि डु प्लेसिस दोघेही अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या षटकात क्लीन बोल्ड झाले. सुनील नारायणने कोहलीला बाद केलं तर वरुण चक्रवर्तीने आरसीबीचा कर्णधार डु प्लेसिसला बाद करून केकेआरला दिलासा दिला. वरुण चक्रवर्तीने फिरकीची कमाल दाखवत ग्लेन मॅक्सवेल (५) आणि हर्षल पटेल (0) बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला. केकेआरसाठी चक्रवर्तीने ४ विकेट्स घेतल्या. तर इॅम्पॅक्ट प्लेयर सुयश शर्माने ३ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली. तर शार्दुल ठाकूरला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil gavaskar criticizes kolkata night riders player mandeep singh because of poor performance in ipl 2023 nss