IPL 2025 Final Prediction: आयपीएल २०२५ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. प्लेऑफमध्ये जाणारे ४ संघ ठरले आहेत. मात्र, कोणते २ संघ क्लालिफायर १ चा सामना खेळणार, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या चारही संघांना टॉप २ मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. या ४ पैकी २ संघ अंतिम सामना खेळतील. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने कोणते २ संघ अंतिम सामन्यात प्रवेश करतील याबाबत भविष्यवाणी केली आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

पंजाब किंग्ज मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यात जो संघ बाजी मारणार, तो संघ गुणतालिकेत टॉप २ मध्ये प्रवेश करणार आहे. आकाश चोप्राच्या मते, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ अग्रगण्य स्थानी राहू शकतो. हे दोन्ही संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकतात असं म्हटलं जात आहे.

आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “मला वाटतं, मुंबई इंडियन्सचं पारडं जड आहे. कारण हा संघ दमदार कामगिरी करत आहे. मला तरी वाटतं की, मुंबई आणि बंगळुरूचा संघ टॉप २ मध्ये प्रवेश करू शकतो. अंतिम सामन्यातही हे दोन्ही संघ आमनेसामने येतील.”

मुंबई इंडियन्सची दमदार कामगिरी

मुंबई इंडियन्सला या स्पर्धेतील सुरूवातीच्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर या संघाने सलग ६ सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.मात्र, मुंबईला नंबर १ स्थानी जाण्याची संधी असणार आहे. दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध झालेला सामना हा मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा होता.

कारण हा सामना मुंबईने गमावला असता, तर मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नसता. या सामन्यात मुंबईने एकतर्फी विजयाची नोंद करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. गुणतालिकेबद्दल बोलाचयं झालं, तर १८ गुणांसह गुजरात टायटन्सचा संघ अव्वल स्थानी आहे. तर १७ गुणांसह पंजाब किंग्जचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. १७ गुणांसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्या स्थानी आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These two teams can enter in ipl 2025 final aakash chopra prediction on final cricket news in marathi amd