Joe Root’s Viral Video: आयपीएल २०२३ मधील २६ वा सामना बुधवारी (१९ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. दोघांमधील हा सामना सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज जो रूटची वेगळी शैली पाहायला मिळाली. जो रुट सराव सत्रा दरम्यान महेंद्रसिंग धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट लगावताना दिसला. त्याच्या यी शॉटचा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर केला आहे. रूटचा हा शॉट चाहत्यांना खूप आवडत आहे.

रूटने असा लगावला हेलिकॉप्टर शॉट –

जो रूटच्या या शॉटचा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रूट हेलिकॉप्टर शॉट खूप छान पद्धतीने खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक हेलिकॉप्टर दाखवण्यात आले आहे की, रूटने ‘हेलिकॉप्टर शॉट’ खेळला आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. ट्विटरवर आतापर्यंत सुमारे ४ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी कमेंट करून आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रूटला अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही –

डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या मिनी लिलावात इंग्लंडच्या या फलंदाजाला राजस्थान रॉयल्सने १ कोटी रुपयांना विकत घेतले होते. आजपर्यंत त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. रूट प्रथमच आयपीएल खेळत आहे. हा फलंदाज त्याच्या आयपीएल पदार्पणाची वाट पाहत आहे.

हेही वाचा – IPL 2023 Fixing: धक्कादायक! मोहम्मद सिराजशी ‘सट्टेबाजाने’ साधला संपर्क, बीसीसीआयकडे पोहोचली तक्रार

राजस्थान रॉयल्स उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे –

दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सबद्दल बोलायचे तर, या हंगामात संघाने आतापर्यंत एकूण ५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये रॉयल्सने ४ जिंकले आहेत. राजस्थान या स्पर्धेत आतापर्यंत ८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. या संघाने आतापर्यंत फक्त पंजाब किंग्जविरुद्धचा सामना गमावला आहे. याशिवाय संघाने पहिला सामना हैदराबादविरुद्ध ७२ धावांनी, दिल्लीविरुद्ध ५७ धावांनी, चेन्नईविरुद्ध ३ धावांनी आणि गुजरातविरुद्ध ३ गडी राखून विजय मिळवला आहे.