Asia Cup 2025 Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan Video: भारत आणि बांगलादेश यांच्यात आशिया चषक सुपर फोरमधील सामना खेळवला जात आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशला विजयासाठी १६९ धावांचं आव्हान दिलं आहे. प्रत्युत्तरात बांगलादेश कडवी झुंज देत आहे. दरम्यान भारताचा सामना पाहण्यासाठी बॅड्स ऑफ बॉलीवूड या वेब सिरीजमधील काही कलाकार पोहोचले आहेत.

शाहरूख खानचा लेक आर्यन खान दिग्दर्शित बॅड्स ऑफ बॉलीवूड ही वेब सीरिज सध्या ओटीटीवर गाजत आहे. या वेब सीरिजमध्ये बॉलीवूडमधील अनेक कलाकार आहेत. दरम्यान यामधील कलाकार बॉबी देओल आणि राघव जूयाल दुबईत भारताच्या सामन्यासाठी पोहोचले आहेत. भारताच्या गोलंदाजीदरम्यान जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने या दोघांची मुलाखत घेतली.

बॉबी देओल यादरम्यान म्हणाला की, लहानपणापासून तो क्रिकेट खेळत पाहत मोठा झालाय. अभिनयानंतर क्रिकेट त्याला सर्वाधिक आवडतं. तर राघव जूयाल प्रथमच स्टेडियममध्ये सामना लाईव्ह पाहत असल्याचं तो म्हणाला. यादरम्यान त्या दोघांनीही जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचं कौतुक केलं.

भारताला सामन्यादरम्यान काय मेसेज देऊ इच्छिता आणि सामना कोण जिंकेल काय वाटतं, असा प्रश्न संजनाने विचारला. तेव्हा बॉबी म्हणाला भारत जिंकणार आहे. पण त्यांनी नेहमीप्रमाणे खेळावं अशी माझी इच्छा आहे. तितक्यात राघव म्हणतो, जसप्रीत बुमराह माझा आवडता खेळाडू आहे. माझी इच्छा आहे की यातील माझा एक डायलॉग तुम्ही बोलावा, असं तो संजनाला सांगतो.

संजना गणेशनदेखील राघवने सांगितल्याप्रमाणे “अख्खी दुनिया एक तरफ और मेरा बुमराह एक तरफ” हा डायलॉग म्हणते. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तर संजना गणेशन बॉबी देओल आणि राघव जुयाल यांची मुलाखत घेतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.