Joe Root became the highest Test run scorer at Lord’s : इंग्लंडच्या जो रुटने गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये इतकी दमदार कामगिरी केली आहे की, कसोटी क्रिकेटमध्ये सचिनचा सर्वाधिक धावांचा विक्रम जर कोणी फलंदाज मोडेल, तर तो रुटच असेल, असा विश्वास क्रिकेटविश्वातील प्रत्येकाला वाटतो. कारण रूट सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत विक्रमांची रांग लावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जो रूट इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा फलंदाज –

जो रूटने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या डावात १४३ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावातही त्याने १०३ धावा केल्या आणि लंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावली. त्याचे कसोटी क्रिकेटमधील हे ३४ वे शतक आहे. यासह तो इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनला आहे. त्याने ॲलिस्टर कुकचा विक्रम उद्ध्वस्त केला आहे. रुटने कसोटी क्रिकेटमध्ये ३४ शतके झळकावली आहेत. त्याचवेळी कुकने कसोटीत ३३ शतके झळकावली होती.

इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे फलंदाज:

  • जो रूट – ३४ शतके
  • ॲलिस्टर कुक – ३३ शतके
  • केविन पीटरसन- २३ शतके
  • वॅली हॅमंड – २२ शतके
  • कॉलिन कॉर्डरे – २२ शतके

जो रुट लॉर्ड्सवर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज –

जो रूट कसोटी क्रिकेटच्या इतिहासात लॉर्ड्सवर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. जगातील सर्व फलंदाजांना मागे टाकत त्याने पहिले स्थान मिळवले आहे. रुटने लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर २०१५ कसोटी धावा करण्याचा ग्रॅहम गूचचा विक्रम मोडीत काढला आहे. आता रूटने लॉर्ड्सच्या मैदानावर २०२२ कसोटी धावा केल्या आहेत. तसेच लॉर्ड्सवरील कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावणारा जो रूट हा चौथा फलंदाज ठरला आहे.

लॉर्ड्सवर कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावणारे फलंदाज –

  • १०६ आणि १०७ – जॉर्ज हॅडली (वेस्ट इंडीज) विरुद्ध इंग्लंड, १९३९
  • ३३३ आणि १२३ – ग्रॅहम गूच (इंग्लंड) विरुद्ध भारत, १९९०
  • १०३ आणि १०१* – मायकेल वॉन (इंग्लंड) विरुद्ध वेस्ट इंडीज, २००४
  • १४३ आणि १०३ – जो रूट (इंग्लंड) विरुद्ध श्रीलंका, २०२४
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Joe root make most test runs at lords cricket ground and most test centuary for england during eng vs sl 2nd test match vbm