Jos Buttler hit six out of stadium video viral : इंग्लंडच्या कर्णधार जोस बटलर टी-२० विश्वचषकापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतून इंग्लंड संघात पुनरागमन केले आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात जोस बटलरची बॅट तळपली नव्हती. तो रोमॅरियो शेफर्डच्या चेंडूवर बटलर गोल्डन डक ठरला होता. मात्र, मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तो मैदानात आला, तेव्हा त्याने आपली प्रतिभा दाखवून दिली. त्याने ४५ चेंडूंत ८३ धावांची विस्फोटक खेळी साकारत इंग्लंडला ७ विकेट्सनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. या दरम्यान त्याने एक असा उत्तुंग षटकार मारला, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात जोस बटलरने ११५ मीटर लांब षटकार ठोकला. त्याचा हा षटकार क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लांब षटकारांपैकी एक ठरला आहे. जोस बटलरने नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर वेस्ट इंडिजचा लेफ्ट आर्म स्पिनर गुडाकेश मोतीच्या षटकात समोरच्या दिशेला गगनचुंबी षटकार ठोकला. जो बटलरने पूर्ण ताकदीनिशी षटकारासाठी मारलेला चेंडू स्टेडियमच्या छतावर आदळल्यानंतर बाहेर गेला. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

विल जॅकसह साकारली तब्बल १२९ धावांची दमदार भागीदारी –

या सामन्यात कर्णधार जोस बटलर फलंदाजी आला होता, तेव्हा इंग्लंडने शून्यावर एक विकेट गमावली होती. येथून त्याने तुफानी फलंदाजी करत ४५ चेंडूत ८३ धावा केल्या. ज्यामध्ये ८ चौकारांशिवाय त्याने ६ षटकारही मारले. फिल सॉल्टच्या रुपाने इंग्लंड पहिला धक्का बसला होता. यानंतर बटलरने विल जॅकसह दुसऱ्या विकेटसाठी ७२ चेंडूत १२९ धावांची वादळी भागीदारी केली. यामध्ये जॅकचे २९ चेंडूत ३८ धावांचे योगदान होते.

हेही वाचा – Gautam Gambhir : रोहित शर्मा नाही तर कोण…? बुमराह नेतृत्व करणार अन् ‘हा’ खेळाडू देणार सलामी, गौतम गंभीरने केलं स्पष्ट

या मालिकेत इंग्लंड २-० ने घेतली आघाडी –

इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ८ गडी गमावून १५८ धावा केल्या होत्या. कर्णधार रोव्हमन पॉवेलने ४१ चेंडूत ४३ धावांची सर्वोच्च खेळी खेळली. इंग्लंडने ३१ चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठले. या मालिकेतील तिसरा सामना डॅरेन सॅमी स्टेडियमवर १४ नोव्हेंबरला होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jos buttler hit 115 meter longest six out of stadium video viral during west indies vs england 2nd t20i vbm