Gautam Gambhir Press conference : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरुवात होणार आहे. भारताला ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर २२ नोव्हेंबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ दरम्यान ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या दोन्ही संघांतील हे पाच कसोटी सामने अनुक्रमे पर्थ, ॲडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनी येथे खेळवले जातील. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची सोमवारी पत्रकार परिषद पार पडली. ज्यामध्ये त्याने रोहित शर्माच्या संबंधित आणि इतर सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.

रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह लवकरच दुसऱ्या मुलाचे पालक होणार आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला रोहित शर्माची मुकण्याची शक्यता आहे. याशिवाय रोहित शर्मा दुसरी कसोटी खेळणार की नाही याबाबतही संभ्रम आहे. जर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकला नाही, तर टीम इंडियासाठी कोण सलामी देईल आणि नेतृत्व कोण करेल? याबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने काही प्रमाणात चित्र स्पष्ट केले आहे.

रोहितच्या अनुपस्थितीत कोण देणार सलामी?

भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पत्रकार परिषदेत म्हणाला, ‘जर रोहित शर्मा उपलब्ध नसेल तर आम्ही पहिल्या कसोटीच्या जवळ निर्णय घेऊ. केएल राहुल उपस्थित आहे. अभिमन्यू ईश्वरन देखील उपस्थित आहेत. आम्ही सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह खेळण्याचा प्रयत्न करू. अभिमन्यू ईश्वरनने रणजी ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध सामना खेळला होता, ज्यामध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती.’

हेही वाचा – Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला

रोहितच्या अनुपस्थितीत कोण असणार कर्णधार?

याशिवाय गौतम गंभीर म्हणाला, ‘मला कोणत्याही प्रकारचे दडपण जाणवत नाही, भारताचा प्रशिक्षक होणं हा सन्मान आणि अभिमानाची गोष्ट आहे. आमच्यावर होत असलेली टीका आम्ही स्वीकारतो. आता पुढे जायचे आहे. ऑस्ट्रेलिया ही नवी मालिका आहे.’ टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आता स्पष्ट केले आहे की, जर रोहित शर्मा उपलब्ध नसेल तर त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करू शकतो. गौतम गंभीर म्हणाला, ‘रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह भारताचे नेतृत्व करेल.’

हेही वाचा – IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौतम गंभीर केएल राहुलबद्दल काय म्हणाला?

गौतम गंभीर म्हणाला, ‘केएल राहुल टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करू शकतो, तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, तो सहाव्या क्रमांकावरही खेळू शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे खूप प्रतिभा हवी आहे आणि तो एकदिवसीय सामन्यांमध्येही खेळतो. कल्पना करा की केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत. रोहित उपलब्ध नसेल तर तो एक पर्याय आहे.’