IND vs ENG 5th T20I Updates in Marathi: भारत वि इंग्लंड पाचवा टी-२० सामना मुंबईत खेळवला जात आहे. वानखेडेवर सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जोस बटलरने नाणेफेक जिंकल्यानंतर बोलताना प्लेईंग इलेव्हन जाहीर केली. पण प्लेईंग इलेव्हन सांगत असताना जोस बटलरने भारतीय संघाला वानखेडेवर टोमणा मारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाणेफेकीनंतर बोलताना इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने असा काही टोमणा लगावला की त्याने हर्षित राणाच्या कनक्शन सबस्टीट्यूटबाबत नाराजी पुन्हा दिसून आली. प्लेइंग इलेव्हनबद्दल माहिती देताना बटलर म्हणाला की, आमच्या संघात ४ इम्पॅक्ट सब आहेत.

मुंबईतील सामन्याच्या आधी नाणेफेक करताना ‘इम्पॅक्ट सब्स’चा उल्लेख केल्यामुळे जोस बटलरने पुणे T20I कनक्शन सबस्टिट्यूटबाबत पुन्हा नाराजी व्यक्त केली. शिवम दुबेच्या डोक्याला चौथ्या टी-२० सामन्यात फलंदाजीदरम्यान चेंडू लागला. सामन्यानंतर त्याला चक्कर आल्याची त्याने तक्रार केली यानंतर त्याच्या जागी कनक्शन सबस्टिट्यूट म्हणून हर्षित राणाला संधी देण्यात आली. हर्षित राणाने मैदानात येताच बटलरला बाद केलं. त्यानंतर त्याने ३ विकेट्स घेत इंग्लंडचं कंबरडं मोडलं. दुबेच्या जागी त्याला कशी संधी दिली यावरून मोठा गदारोळ सुरू होता.

जोस बटलरने सामन्यानंतर हा निर्णय आम्हाला पटला नसल्याचे त्याने सांगितले तर अजूनही या निर्णयावरची नाराजी बटलरने व्यक्त केली. नाणेफेकीनंतर तो म्हणाला, “संघात चांगलं वातावरण आहे. कोणत्याही फॉरमॅटमधील क्रिकेट खेळण्यासाठी हे खूप चांगलं ठिकाण आहे. खेळपट्टी खूप चांगली आहे, आम्ही लक्ष्याचा पाठलाग करणार आहोत. संघात एक बदल आहे. मार्क वुड प्लेईंग इलेव्हनमध्ये परतला आहे आणि आमच्या संघात ४ इम्पॅक्ट सब आहेत जे रेहान अहमद, साकिब महमूद, जॅमी स्मिथ आणि गस एटकिन्सन”

दोन्ही संंघांची प्लेईंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन):
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन):
फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jos buttler takes dig at india after pune concussion substitue of harshit rana in ind vs eng 5th t20i bdg