कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. भारताने पहिल्या डावात ३४५ धावा केल्या. यानंतर विल यंग आणि टॉम लॅथम यांनी न्यूझीलंडला दमदार सुरुवात करून देत भारतावर दबाव आणला. या सामन्यात पहिल्या दिवशी ‘गुटखा मॅन’ व्हायरल झाल्यानंतर दुसरा दिवस एका आयपीएस अधिकाऱ्याचा ठरला. एका गोष्टीमुळे अधिकारी असीम अरुण हे खूप चर्चेत ठरले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर कसोटी सामना पाहण्यासाठी आलेले लोक आपापल्या सीटवर कचरा टाकून निघून गेले. त्यानंतर स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल उचलत पोलीस आयुक्त असीम अरुण यांनीच स्टेडियममधील कचरा उचलण्यास सुरुवात केली. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – PHOTOS : बॉलिवूडची ‘ही’ HOT अभिनेत्री आजही द्रविडच्या प्रेमात; म्हणाली, “माझं पहिलं प्रेम…”

अरुण यांच्या उपक्रमामुळे सोशल मीडियावर त्यांचे भरभरून कौतुक होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी खूप प्रशंसा केली आहे. अरुण यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ”बर्‍याच काळानंतर उद्या ग्रीन पार्क पुन्हा चमकेल. काही देशांचे लोक स्टेडियम स्वच्छ ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतात हे ऐकले आणि वाचले, आपणही असे काही करू शकतो का?”, असा सवाल अरुण यांनी उपस्थित केला.

कोण आहेत असीम अरुण?

असीम अरुण हे १९९४च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. देशाची सुरक्षा व्यवस्था चोख निभावण्यात असीम यांचा मोठा हात आहे. यापूर्वी त्यांचा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सुरक्षा दलातही समावेश करण्यात आला होता. देशातील पहिली SWAT टीम तयार करण्याचे श्रेय असीम यांना जाते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanpur police commissioner aseem arun cleaning trash at green park stadium adn