Kuldeep Yadav Bowled Shai Hope Video: भारताने वेस्ट इंडिजविरूद्ध पहिल्याच कसोटीत दणदणीत सुरूवात केली आहे. अहमदाबादमध्ये होत असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने गोलंदाजीने सुरूवात केली आणि पहिल्याच सत्रात वेस्ट इंडिजचा निम्मा संघ माघारी परतला आहे. पहिल्या कसोटीत भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे आणि त्याने पहिल्याच स्पेलमध्ये तो उत्कृष्ट फिरकीपटू का आहे, हे सिद्ध केलं.

घरच्या मैदानावर होत असलेल्या वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी सामन्यात कुलदीप यादवला अखेरीस संधी मिळाली. कुलदीप यादव हा सध्याच्या घडीला भारताचा उत्कृष्ट फिरकीपटू आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषकामध्ये त्याने शानदार कामगिरी केली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुलदीप यादवला कसोटी संघात तब्बल ३४७ दिवसांनंतर संधी मिळाली आहे. त्याने अखेरचा कसोटी सामना ११ महिन्यांपूर्वी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरूद्ध खेळला होता.

कुलदीप यादवला ३४७ दिवसांनंतर कसोटी संघात संधी

कुलदीप यादवला कर्णधाराने २१व्या षटकात गोलंदाजीची संधी दिली. कुलदीपने स्पेलमधील दुसऱ्याच षटकात भारताला विकेट मिळवून दिली. वेस्ट इंडिजने ५० धावांच्या आत ४ विकेट्स गमावल्यानंतर कर्णधार रोस्टन चेस व शे होप संघाचा डाव सावरत भागीदारी रचत होते. पण कुलदीपने त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं.

कुलदीपने टाकलेला कमालीचा पडताच फिरला आणि थेट स्टंपवर जाऊन आदळला. शे होपला काही कळण्याआत तो त्रिफळाचीत झाला होता. विकेट पाहून होप जागेवरच चकित होत उभा राहिला आणि कुलदीप व विकेटकडे पाहत बसला. होपची विकेट पाहताच कोच डॅरेन सॅमीने डोक्याला हात लावला. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.

भारताची वेस्ट इंडिजविरूद्ध सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हन

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

वेस्ट इंडिजची प्लेईंग इलेव्हन

तेजनारायण चंदरपॉल, जॉन कॅम्पबेल, अलिक अथानाझे, ब्रँडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक), रोस्टन चेस (कर्णधार), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॅरिकन, खारी पियरे, जोहान लेन, जेडेन सील्स