Matheesha Pathirana takes 4 wickets in SL vs BAN Match: आशिया कप २०२३ मधील आपल्या पहिल्या पहिल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशला ४२.४ षटकांत १६४ धावांत गुंडाळले. या कमी धावसंख्येवर बांगलादेशला बाद करण्यात सर्वात मोठे योगदान श्रीलंकेचा गोलंदाज मथीशा पथिरानाने दिले. त्याने आपल्या संघासाठी केवळ सर्वाधिक विकेट घेतल्या नाहीत, तर श्रीलंकेसाठी सर्वात कमी वयात आशिया चषकात चार विकेट घेणारा श्रीलंकेचा पहिला गोलंदाज ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मथीशा पथिरानाने श्रीलंकेसाठी केला नवा विक्रम –

मथीशा पथिरानाने श्रीलंकेविरुद्ध प्राणघातक गोलंदाजी केली आणि ७.४ षटकांत ३२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेकडून एका सामन्यात ४ बळी घेणारा मथीशा पाथिराना हा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने वयाच्या २० वर्षे २५६ दिवसांत आशिया चषकात ४ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. पीयूष चावला हा आशिया चषक स्पर्धेत एका सामन्यात ४ बळी घेणारा सर्वात तरुण भारतीय गोलंदाज आहे. पियुष चावलाने वयाच्या अवघ्या १९ वर्षे १८४ दिवसांत हा पराक्रम केला आहे.

आशिया कपमध्ये एका सामन्यात ४ विकेट घेणारे सर्वात युवा गोलंदाज –

१९ वर्षे १८४ दिवस – पीयूष चावला
१९ वर्षे ३०१ दिवस – वसीम अक्रम
२० वर्षे १८४ दिवस – अब्दुल रज्जाक
२० वर्षे १९९ दिवस – सकलेन मुश्ताक
२० वर्षे २५६ दिवस – मथीशा पथिराना

हेही वाचा – Hotstar आणि Jio च्या स्पर्धेत प्रेक्षकांना झाला मोठा फायदा, Asia Cup पाठोपाठ विश्वचषकाचाही घेता येणार मोफत आनंद

या सामन्यात बांगलादेशची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली, परंतु या संघासाठी सर्वात मोठी खेळी नझमुल हुसैन शांतोने खेळली. त्याने १२२ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ८९ धावा केल्या. कर्णधार शकिब अल हसनने केवळ ५ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर इतर फलंदाजांनीही फारसे काही चांगली कामगिरी केली नाही.

श्रीलंकेच्या गोलंदाजांनी गुंडाळला बांगलादेशचा डाव गुंडाळला –

९५ च्या स्कोअरवर ४ विकेट्स गमावलेल्या बांगलादेशच्या डावाला शांतोसह मुशफिकुर रहीमने नेण्याचा प्रयत्न केला, पण तोही १३ च्या वैयक्तिक स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये परतला. येथून श्रीलंकेच्या गोलंदाजांनी दडपण कायम ठेवत बांगलादेशचा डाव गुंडाळण्यास फारसा वेळ लावला नाही. शांतो १२२ चेंडूत ८९ धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर बांगलादेशचा संपूर्ण संघ ४२.४ षटकांत १६४ धावांत गारद झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matheesha pathirana became the youngest bowler to take 4 wickets for sri lanka in an asia cup match vbm