इंग्लंडचा जेम्स अँडरसन, दक्षिण आफ्रिकेचा हशिम अमला आणि ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क या तिघांना सर गारफिल्ड सोबर्स वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार आणि वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार अशा दोन्ही ठिकाणी नामांकने मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) वार्षिक पुरस्काराचा कार्यक्रम १४ डिसेंबरला टीव्हीवर प्रसारित करण्यात येणार आहे. मंगळवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी एलजी आयसीसी पुरस्कारांसाठीची नामांकन यादी घोषित केली.
वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी इंग्लंडचा कप्तान अ‍ॅलिस्टर कुक, भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनी आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा यांनाही नामांकने मिळाली आहेत. तथापि, वर्षांतील सर्वोत्तम कसोटीपटूसाठी दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन याचप्रमाणे भारताचा आर. अश्विन आणि चेतेश्वर पुजारा यांना मानांकने मिळाली आहेत.
धोनी आणि संगकारा या दोघांनी वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि एकदिवसीय क्रिकेटपटू या दोन्ही पुरस्कारांच्या नामांकनांमध्ये स्थान मिळवले आहे. सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठीच्या मानांकनांमध्ये पाकिस्तानचे मिसबाह उल हक आणि सईद अजमल याचप्रमाणे भारताचे शिखर धवन आणि रवींद्र जडेजा यांचीही नावे आहेत. ७ ऑगस्ट २०१२ ते २५ ऑगस्ट २०१३ या कालावधीमधील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे आयसीसीच्या समितीने ही मानांकन यादी जाहीर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुरस्कारांसाठीची नामांकन यादी
सर्वोत्तम क्रिकेटपटू (सर गॅरी सोबर्स पुरस्कार)
हशिम अमला (दक्षिण आफ्रिका), जेम्स अँडरसन, अ‍ॅलिस्टर कुक  (इंग्लंड), मायकेल क्लार्क (ऑस्ट्रेलिया), महेंद्रसिंग धोनी (भारत), कुमार संगकारा (श्रीलंका).

सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू
हशिम अमला, डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका), जेम्स अँडरसन (इंग्लंड), चेतेश्वर पुजारा, रविचंद्रन अश्विन (भारत), मायकेल क्लार्क (ऑस्ट्रेलिया).
 
सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू
सईद अजमल, मिसबाह उल हक (पाकिस्तान), शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा (भारत), कुमार संगकारा.

सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटू
ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), चेतेश्वर पुजारा (भारत), जो रूट (इंग्लंड), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया).

सर्वोत्तम क्रिकेटपटू (सहसदस्य राष्ट्रांसाठी)
केव्हिन ओ’ब्रायन, ईडी जॉयसे (आर्यलड), कायले कोएत्झर (स्कॉटलंड), नौरोझ मंगल (अफगाणिस्तान).

ट्वेन्टी-२०मधील सर्वोत्तम कामगिरी
उमर गुल (पाकिस्तान), मार्टिन गुप्तिल, ब्रेन्डन मॅक्क्युलम (न्यूझीलंड), अजंथा मेंडिस (श्रीलंका).

सर्वोत्तम महिला एकदिवसीय क्रिकेटपटू
सुझी बेट्स (न्यूझीलंड), चार्लट एडवर्ड्स, अन्या श्रुबसोल (इंग्लंड), मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), डेन व्हान नेकर्क (दक्षिण आफ्रिका), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज).
 
सर्वोत्तम महिला ट्वेन्टी-२० क्रिकेटपटू
सुझी बेट्स (न्यूझीलंड), श्ॉनेल डेली, डीएन्ड्रा डॉटिन (वेस्ट इंडिज), मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), सराह टेलर (इंग्लंड), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज)

सर्वोत्तम पंच (डेव्हिड शेफर्ड पुरस्कार)
आलीम दर, स्टीव्ह डेव्हिस, कुमार धर्मसेना, माराइस इरासमुस, इयान गोल्ड, टोनी हिल, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरोघ, निगेल लिआँग, ब्रुस ओक्झेफोर्ड, पॉल रिफेल, रॉडनी टकर.

आयसीसीचा खेळभावना पुरस्कार
महेला जयवर्धने (श्रीलंका), फरहान रेझा (बांगलादेश).

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni and kumar sangakkara nominated for two individual icc awards