MS Dhoni T-Shirt Morse Code Viral Photo: चॅम्पियन्स ट्रॉफी संपताच सगळीकडे आयपीएलचे वारे वाहू लागणार आहेत. येत्या २२ मार्चपासून आयपीएल २०२५ चा सीझन सुरू होणार आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघाचा माजी कर्णधार एस एस धोनी कॅम्पमध्ये सामील होण्यासाठी चेन्नईत दाखल झाला आहे. धोनीचा एअरपोर्टवरील फोटो सध्या व्हायरल होत आहे. पण या फोटोमध्ये धोनीच्या टी-शर्टमध्ये एक सीक्रेट मेसेज लपवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महेंद्रसिंग धोनी नेहमीच त्याच्या भविष्यातील प्लॅन्सबद्दल अनोख्या पद्धतीने चाहत्यांसमोर मांडत असतो. २०२० मध्ये त्याने भारताच्या स्वातंत्र्यदिनी इन्स्टाग्रामवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करेल अशी फार कमी जणांना अपेक्षा होती. पण धोनीने तेव्हाच निवृत्ती जाहीर केली. गेल्या काही वर्षांमध्ये धोनीने इंडियन प्रीमियर लीगमधील त्याच्या भविष्याविषयी वारंवार चर्चा केली जात आहे. पण आता आयपीएल २०२५ हंगामापूर्वी त्याच्या चाहत्यांना ‘स्पष्ट’ संदेश धोनीने दिला आहे.

बुधवारी, २६ फेब्रुवारी रोजी चेन्नईला आल्यावर त्याचा एअरपोर्टवरील फोटो व्हायरल होत आहे. यादरम्यान धोनीने जे टी-शर्ट घातलं होतं, त्या टी-शर्टवर “एकदा शेवटचं” असे स्पष्टपणे लिहिलेले होते. परंतु धोनीच्या शैलीत म्हणायचं तर धोनीने अनोख्या पद्धतीने हा मेसेज दिला आहे. धोनीच्या टी-शर्टवर आपण पाहिलं तर छोट्या मोठ्या रेषा दिसत आहेत. पण खरं तर हा मोर्स कोड आहे. यावरून धोनी यंदा अखेरचा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

मोर्स कोड ही डॉट आणि डॅशेसच्या माध्यमातून संवाद साधण्याची एक पद्धत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी हा फोटो व्हायरल होताच एआयच्या माध्यमातून चॅट जीपीटीवरून यो मोर्स कोडमध्ये नेमकं काय म्हटलं आहे, हे डिकोड केलं. इंग्रजीत याचा अर्थ ‘One Last Time’ असा आहे. म्हणजेच धोनी अखेरचा आयपीएलमध्ये उतरणार आहे असा संदेश देत असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. धोनी आयपीएल २०२५ पूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात सहभागी होण्यासाठी निघाला होता, तेव्हा त्याने हे टी-शर्ट घातले होते.

धोनीच्या टी-शर्टवरील डिकोड केलेला मोर्स कोड

ONE | — -. .
LAST | .-.. .- … –
TIME | – .. — .

धोनीच्या टी-शर्टवरील मोर्स कोड (फोटो-एक्स)

आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्स त्यांचा पहिलाच सामना मुंबई इंडियन्सविरूद्ध खेळणार आहे.आयपीएलमधील एल क्लासिको सामना म्हणजेच मुंबई वि. चेन्नईत आयपीएलच्या दुसऱ्याच दिवशीच होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni t shirt morse code sparks retirement speculation with one last time ahead of ipl 2025 csk bdg