मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना दिले आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर विराजमान झालेल्या पवार यांच्या वैधतेला मुंडे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, पवार यांना एमसीएचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यानंतर पवार यांनी उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अनुप मोहता यांच्या खंडपाठीने सुनावणीसाठी १६ डिसेंबर ही तारीख निश्चित करताना मुंडे आणि अन्य याचिकाकर्त्यांना पवारांच्या याचिकेला उत्तर देण्याचे निर्देशही दिले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2013 रोजी प्रकाशित
पवारांच्या याचिकेला उत्तर देण्याचे मुंडेंना आदेश
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेते
First published on: 16-12-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Order to gopinath munde to answer pawars petition