T20 World Cup PAK vs BAN: आज टी २० विश्वचषकात नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला यामुळे दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत जाण्याची संधी जवळपास गमावलीच होती. आजच्या दिवसातील दुसरा सामना म्हणजेच पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेशमध्येही पाकिस्तानने बांग्लादेशवर विजय मिळवून सेमीफायनल मध्ये प्रवेश घेतला आहे. जरी पाकिस्तानचा विजय झाला असला तरी पाकिस्तानला जीवनदान देण्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा हातभार जास्त आहे असेच दृश्य समोर येत आहे. केवळ क्रिकेटप्रेमीच नव्हे तर स्वतः पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेही व्हिडीओमधून असंच काहीसं मत मांडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोएब अख्तरने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेचे आभार मानले आहेत, तुम्ही हरलात व तुम्हाला दिलेल्या चोकर पदवीला सार्थ ठरलात म्हणून तुमचे आभार तुमच्यामुळे पाकिस्तानला लॉटरी लागली आहे असेही अख्तर म्हणाले होते. तसेच पाकिस्तानचा बांग्लादेश विरुद्ध सामनाही अटीतटीचा ठरेल असा विश्वास व्यक्त केला होता मात्र प्रत्यक्ष बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तानचा सामना हा काही अंशी एकतर्फीच ठरला आहे. पाकिस्तानने आज बांग्लादेशवर ५ गडी राखून विजय मिळवला आहे.

काय म्हणाले शोएब अख्तर

SA vs NED: सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेला असा चिमटा घेतला सेहवाग म्हणतो मज्जा आली, पाहा ट्वीट

टी २० विश्वचषकात आता पॉईंट टेबल मध्ये भारत ६ पॉइंट्ससह ग्रुप २ मध्ये टॉपला आहे तर आता आजच्या सामन्यातील विजयसह पाकिस्तानही ६ पॉईंट्स कमावून दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. आज भारत विरुद्ध झिम्बाम्बावे सामन्यात भारत विजयी झाल्यास भारताचे एकूण गुण ८ होऊन टॉपचे स्थान कायम ठेवता येईल, नेदरलँडच्या विजयामुळे भारत अगोदरच टी २० विश्वचषक सेमीफायनल मध्ये दाखल झाला आहे आता त्यापाठोपाठ पाकिस्तानही उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan beats bangladesh enters t20 semi finals shoaib akhtar thanks south africa choker t20 point table svs