Paris Paralympics 2024 Narendra Modi Calls Medalists : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकलेल्या खेळाडूंना फोन करून त्यांच्याशी बातचीत केली, तसेच त्यांच्या कामगिरीचं तोंडभरून कौतुकही केलं. मोदी यांनी हरविंदर सिंह, कपिल परमार, प्रणव सूरमा, धरमबीर व सचिन खिलारी या खेळाडूंशी बातचीत केली. या खेळाडूंचं अभिनंदन करून मोदी त्यांना म्हणाले, तुमचं पदक जिंकणं ही या देशासाठी सर्वात मोठी भेट आहे. मोदी यांनी यावेळी खेळाडूंसह त्यांच्या प्रशिक्षकांचंही कौतुक केलं. या खेळाडूंच्या पदकांमध्ये त्यांच्या प्रशिक्षकांच्या कष्टाचाही मोठा वाटा असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंना मोठं यश मिळवता आलेलं नसलं तरी पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तिरंग्याची शान वाढवली आहे. त्यामुळे मोदी यांनी स्वतः फोन करून पदकविजेत्या खेळाडूंची पाठ थोपटली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताने पहिल्यांदाच या स्पर्धेत २६ पदकं पटकावली आहेत. भारताने सहा सुवर्ण, नऊ कांस्य व ११ रौप्य पदकं जिंकली आहेत. यासह पदकतालिकेत भारताने १७ वं स्थान पटकावलं आहे. चीनने ७५ सुवर्ण पदकांसह एकूण १७१ पदकं जिंकली आहेत. पदकतालिकेत ड्रॅगन पहिल्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा >> Praveen Kumar Wins Gold : प्रवीण कुमारने रेकॉर्डब्रेक उंच उडी मारत पटकावले सुवर्णपदक! भारताला मिळवून दिले २६ वे पदक

दोन स्पर्धांमध्ये भारताने ४५ पदकं पटकावली

भारताने पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये आजवर ५७ पदकं जिंकली आहेत. यामध्ये १५ सुवर्ण, २१ रौप्य व २१ कांस्य पदकांचा समावेश आहे. १९६० मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून भारताने आतापर्यंत या स्पर्धेच्या १२ हंगामांमध्ये सहभाग नोंदवला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा ही भारतासाठी आजवरची सर्वात यशस्वी स्पर्धा ठरली आहे. २०२० च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने १९ पदकं पटकावली होती.

हे ही वाचा >> R Ashwin : नितीश कुमार रेड्डीची खिल्ली उडवणाऱ्या पाकिस्तानी चाहत्याला अश्विनने शिकवला चांगलाच धडा, मीम्स व्हायरल

मागील आठ वर्षांमध्ये स्थिती सुधारली

१९७२ ते २०१६ पर्यंत भारताने १० ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. मात्र या १० स्पर्धांमध्ये भारताने केवळ १२ पदकं जिंकली होती. गेल्या काही वर्षांमध्ये खेलो इंडिया युथ गेम्स आणि टॉप्ससारख्या योजनांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक खेळाडू पुढे आले, त्यांना चांगली संधी व प्रशिक्षण मिळालं. परिणामी भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा व पॅरालिम्पिकमधील कामगिरी सुधारली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paris paralympics 2024 pm narendra modi calls medallists sachin khilari coaches asc