Prasidh Krishna: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जॅक क्रॉली आणि बेन डकेटने दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १८८ धावा जोडल्या. जॅक क्रॉली ६५ धावा करून माघारी परतला. क्रॉली बाद होताच प्रसिद्ध कृष्णाने इंग्लडला दुसरा मोठा धक्का दिला. ओली पोप ८ धावांवर त्रिफळाचित होऊन माघारी परतला.

या डावात धावांचा पाठलाग करताना जॅक क्रॉली आणि बेन डकेटने मिळून दमदार सुरुवात करून दिली. बेन डकेटने आपलं शतक पूर्ण केलं. पण जॅक क्रॉली ६५ धावांवर माघारी परतला. प्रसिद्ध कृष्णाने जॅक क्रॉलीला बाद करत ही जोडी फोडली. जॅक क्रॉली बाद झाल्यानंतर इंग्लंडला लगेचच दुसरा मोठा धक्का बसला. प्रसिद्ध कृष्णाने भन्नाट चेंडू टाकून ओली पोपला त्रिफळाचित करत माघारी धाडलं.

तर झाले असे की, भारतीय संघाकडून ४५ वे षटक टाकण्यासाठी प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजीला आला. पाऊस पडल्यामुळे भारतीय संघाला विश्रांती मिळाली होती. विश्रांतीनंतर गोलंदाजीला येताच प्रसिद्धच्या गोलंदाजीची गती आणखी वाढली. या षटकातील चौथा चेंडू त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. जो टप्पा पडताच आत आला आणि ओली पोपला त्रिफळाचित करून गेला.

इंग्लंडचा संघ विजयाच्या जवळ

इंग्लंडचा संघ विजयाच्या जवळ पोहोचला आहे. भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान ठेवले आहे. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला चांगली सुरूवात मिळाली. इंग्लंडच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी १८८ धावा जोडल्या. यादरम्यान बेन डकेटने १४९ धावांची खेळी केली. तर जॅक क्रॉलीने ६५ धावांची खेळी केली. जो रूट १४ धावांवर नाबाद आहे. तर बेन स्टोक्सने आतापर्यंत १३ धावा केल्या आहेत. इंग्लंडलने ४ गडी बाद २६९ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २-२ गडी बाद केले आहेत. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजा यांना एकही गडी बाद करता आलेला नाही. इंग्लंडला अजूनही विजयासाठी १०२ धावांची गरज आहे.