scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

प्रसिद्ध कृष्णा

प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) हा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. तो राज्यस्तरावर कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याचा जन्म १९ फेब्रुवारी १९९७ रोजी कर्नाटकमधल्या बंगळुरु शहरामध्ये झाला. २०१५ मध्ये बांगलादेश-ए विरुद्ध झालेल्या सामन्यामुळे प्रसिद्ध कृष्णा प्रकाशझोतात आला. कर्नाटक आणि बांग्लादेश-ए यांच्यादरम्यान सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यामध्ये कर्नाटक संघाचे ३ वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने कृष्णाला संघामध्ये सामील करण्यात आले. मिळालेल्या संधीचं सोनं करत प्रसिद्ध कृष्णाने ५ फलंदाजांना बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे कर्नाटक संघाचा विजय निश्चित झाला.


पुढे २०१६-१७ मध्ये त्याला विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Hazare Tropify)  खेळायची संधी मिळाली. त्यानंतर त्याने रणजी ट्रॉफी, मुश्ताक अली ट्रॉफी अशा स्पर्धांमध्येही प्रसिद्ध कृष्णा झळकला. थोड्याच कालावधीत इंडिया ए संघात त्याची निवड झाली. दरम्यान २०१८ च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच केकेआर या संघामध्ये कृष्णाला सामील करण्यात आले. कमलेश नागरकोटी या गोलंदाजाच्या जागी त्याला खेळवण्यात आले. मे २०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात शिवम मावीच्या ऐवजी प्रसिद्ध कृष्णाची निवड करण्यात आली. २०१८ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत तो केकेआरमध्ये होता. पुढे २०२२ च्या लिलावामध्ये राजस्थान रॉयल्सने १० कोटी रुपयांची बोली लावली. राजस्थानच्या संघामध्ये गेल्यानंतर कृष्णाचा खेळामध्ये प्रगती झाल्याचे पाहायला मिळाले.


मार्च २०२१ मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामन्यामध्ये प्रसिद्ध कृष्णाला सामील करण्यात आले. ही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात ठरली. २३ मार्च २०२१ रोजी त्याने पदार्पण केले. या सामन्यामध्ये त्याने ४ गडी बाद केले. भारताने हा एकदिवसीय सामना ६६ धावांनी जिंकला होता. ऑगस्ट २०२३ मध्ये कृष्णाने आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. २०२३ च्या आयपीएलच्या हंगामामध्ये त्याने चांगला खेळ केला होता. एकूण कामगिरी पाहून बीसीसीआयने आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) च्या संघामध्ये त्याचा समावेश केला आहे.



Read More
Prasidh Krishna Clean Bowled Mitchell hey on Perfect Ball Virat Kohli Reaction on wicket Video Viral
काय चेंडू होता यार! प्रसिधच्या भेदक चेंडूवर मिचेल क्लीन बोल्ड, फलंदाजही झाला चकित; विराटची प्रतिक्रिया व्हायरल; VIDEO

Prasidh Krishna Bowled: प्रसिध कृष्णाने कमालीचा चेंडू टाकत न्यूझीलंडच्या मिचेल हे क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं. यावर विराट कोहलीची प्रतिक्रिया…

Prasidh Krishna Clean bowled Quinton de kock with Fiery ball Stumps Flying Video Viral IND vs SA 3rd ODI
IND vs SA: प्रसिध काय चेंडू होता यार! क्विंटन डीकॉक क्लीन बोल्ड, हवेत उडाले स्टंप, डीकॉकही गडबडला; VIDEO व्हायरल

Quinton De Kock Wicket: प्रसिध कृष्णाने उत्कृष्ट चेंडू टाकत शतकी खेळी केलेल्या क्विंटन डीकॉकला क्लीन बोल्ड केलं. त्याने घेतलेल्या या…

team india
IND vs SA, Playing XI: निर्णायक सामन्याआधी मोठा उलटफेर! स्टार गोलंदाजाची सुट्टी होणार, ‘या’ खेळाडूला मिळू शकते संधी; पाहा प्लेईंग ११

IND vs SA 3rd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्याआधी कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग ११? जाणून…

team india
Team India: भारतीय संघाला मोठा धक्का! वेस्टइंडिजविरूद्धच्या मालिकेआधी स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Prasidh Krishna: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली…

mohammed siraj prasidh krishna
IND vs ENG: मोहम्मद सिराज झाला प्रसिद्ध! पण कृष्णाचंही ऐतिहासिक विजयात मोलाचं योगदान

Mohammed Siraj- Prasiddh Krishna: भारतीय संघाने ओव्हलच्या मैदानावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली. दरम्यान या विजयात सिराज आणि प्रसिध कृष्णाने मोलाचं…

India vs England 5th Test Day 5 Live cricket score, players in action
IND vs ENG: भारताचा इंग्लंडवर ६ धावांनी चित्तथरारक विजय; मालिका २-२ बरोबरीत

India vs England 5th Test Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने दमदार…

dhruv jurel
VIDEO: भारताचा विजय सुकर करणारी रूटची विकेट; जुरेलचा भन्नाट झेल पाहा

Dhruv Jurel Catch: ओव्हल कसोटीतील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडला ३७४ धावांची गरज होती. या डावात जो रूटने दमदार शतकी…

joe root
Ind vs Eng: जो रूट- प्रसिध कृष्णा लाईव्ह सामन्यात का भिडले? नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Joe Root vs Prasidh Krishna: जो रूट आणि प्रसिध कृष्णा यांच्यातील वाद नेमका कशामुळे झाला? याबाबत प्रसिध कृष्णाने मोठा खुलासा…

Joe Root Abuse Prasidh Krishna in Heated Exchange During IND vs ENG 5th test VIDEO
IND vs ENG: रूट-प्रसिधमध्ये मैदानातच राडा, इंग्लंडच्या फलंदाजाने घातल्या शिव्या; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Joe Root Prasidh Krishna Fight: ओव्हल कसोटीत जो रूट आणि प्रसिध्द कृष्णा यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. रूट प्रसिध्दला शिव्याही घालताना…

prasidh krishna
Ind vs Eng: धू धू धुतलं! प्रसिद्ध कृष्णाने नोंदवला कसोटीतील नकोसा रेकॉर्ड

Prasidh Krishna Record: भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या नावे नकोसा रेकॉर्डची नोंद झाली आहे. त्याने एकाच षटकात २३ धावा खर्च…

harry brook
IND vs ENG: हॅरी ब्रुकने मस्त डोकं लावलं! विकेट वाचवण्यासाठी अशी लढवली शक्कल; पाहा video

Harry Brook Saves His Wickets: दुसऱ्या कसोटीत हॅरी ब्रुक बाद होणारच होता, इतक्यात त्याने डोकं लावलं आणि आपली विकेट वाचवली.

prasidh krishna
IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णाच्या भन्नाट बॉलवर ओली पोपची बत्ती गुल! VIDEO एकदा पाहाच

Prasidh Krishna Took Wicket Of Ollie Pope: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने ओली पोपला त्रिफळाचित केलं. ज्याचा व्हिडीओ सध्या…

संबंधित बातम्या