Ritika Sajdeh Reacton on Sunil Gavaskar statement after Aaron Finch Comment : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरूवात होण्याआधीच बऱ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. २२ नोव्हेंबरपासून पाच कसोटी सामन्यांची ही मालिका सुरू होत आहे. टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे, पण कर्णधार रोहित शर्माबद्दल असे बोलले जात आहे की, तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. इतकंच नाही तर दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याच्या खेळण्यावर साशंकता आहे. याबाबत माजी सुनील गावस्करांनी एक वक्तव्य केले होते, ज्यावर रितिकाने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनील गावस्कर काय म्हणाले?

सुनील गावस्करांनी केलेल्या वक्तव्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंचने असहमती व्यक्त करत रोहित शर्माचे समर्थन केले. ज्यावरील रितिका सजदेहची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. खरं तर संपूर्ण प्रकरण असं आहे की, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप होणार आहे. त्यामुळेच रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. या मुद्द्यावर सुनील गावस्कर यांनी रोहितबद्दल सांगितले की, जर तो पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकला नाही, तर त्याने कर्णधार म्हणून नव्हे तर फलंदाज म्हणून या मालिकेत सहभागी व्हावे.

सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर आरोन फिंच असहमत –

सुनील गावस्कर यांच्या वरील विधानावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंचने असहमती व्यक्त करत रोहित शर्माचे समर्थन केले. आरोन फिंच म्हणाला, जर रोहित शर्मा आपल्या मुलाच्या जन्मासाठी उपलब्ध नसेल, तर तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. आरोन फिंचच्या या विधानावर रितिका सजदेहची प्रतिक्रिया आश्चर्यकारक होती, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी

रितिका सजदेहची प्रतिक्रिया व्हायरल –

आरोन फिंच सुनील गावस्करांच्या विधानाशी असहमती व्यक्त करताना म्हणाला की, ‘मी सनीशी असहमत आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्याच्या पत्नीला मूल होणार आहे म्हणून जर त्याला घरीच राहावे लागत असेल, तर हा खूप सुंदर क्षण आहे. या प्रकरणात तो त्याला पाहिजे तितका वेळ घेऊ शकतो.’ आरोन फिंचच्या या विधानावर रितिकाने सॅल्युट इमोजीसह प्रतिक्रिया दिली. जी आता प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ritika sajdeh defends husband rohit sharma and reacts to sunil gavaskar statement after aaron finch reaction vbm