भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा त्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जायचा. क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर सचिन आपला बालपणीचा सहकारी विनोद कांबळीसह Tendulkar-Middlesex Global Academy च्या माध्यमातून नवीन खेळाडूंना प्रशिक्षण देतो आहे. नुकतच सचिनने नवी मुंबईत नवोदीत खेळाडूंना क्रिकेटचे धडे दिले.

या सराव शिबीराचा एक व्हिडीओ सचिन तेंडूलकरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

त्याच्या या व्हिडीओवर आयसीसीने, पंच स्टिव्ह बकनर यांचा फोटो टाकत सचिनला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

मात्र सचिननेही आपल्या नेहमीच्या शैलीत आयसीसीला सडेतोड प्रत्युत्तर देत सर्वांची मनं जिंकली आहेत.

सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या मुंबई टी-२० लिगमध्ये खेळतो आहे. पहिल्या सामन्यात अर्जुनने आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.