Sachin tendulkar on Women World Cup 2025 Final : भारताच्या रणरागिणींनी इतिहास रचला आहे. आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप २०२५ च्या फायनलमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला आहे. भारतानं नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं पहिल्यांदा आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकला.शेफाली वर्मा यावेळी भारतीय संघासाठी मॅचविनर ठरली. शेफालीने फलंदाजीत सर्वाधिक ८७ धावा तर केल्याच, पण जेव्हा संघाला गरज होती तेव्हा विकेट्सही काढून दिल्या. त्यामुळे शेफाली वर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताला वर्ल्ड कपला गवसणी घालता आली. भारताने वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलंं आहे. यापूर्वी २००५ आणि २०१७ साली भारताने अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण तिसऱ्यांदा भारताने वनडे वर्ल्डकप स्पर्धेवर नाव कोरलं.

दरम्यान आता सर्व स्तरांतून भारताच्या रणरागिणींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान मोदींनीही अभिनंदन करत कौतुक केलं आहे. अशातच क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या अनोख्या कौतुकाची चर्चा रंगली आहे. १९८३ च्या ऐतिहासिक क्षणाचा संदर्भ देत सचिन तेंडुलकरनं हिला संघाच्या विजयाचं कौतुक केलं आहे. सचिन तेंडुलकर नेककं काय म्हणाला पाहूयात.

“१९८३ च्या घटनेने एका संपूर्ण पिढीला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची प्रेरणा दिली. आज, आपल्या महिला क्रिकेट संघाने खरोखरच काहीतरी खास केले आहे. त्यांनी देशभरातील असंख्य तरुणींना बॅट आणि बॉल उचलण्याची, मैदानात उतरण्याची आणि एक दिवस त्याही ती ट्रॉफी उचलू शकतात असा विश्वास ठेवण्याची प्रेरणा दिली आहे. भारतीय महिला क्रिकेटच्या प्रवासातील हा एक निर्णायक क्षण आहे.शाब्बास, टीम इंडिया. तुम्ही संपूर्ण देशाचा अभिमान उंचावला आहे.” कोणताही भारतीय क्रिकेट चाहता १९८३ चा दिवस विसरू शकणार नाही. कारण क्रिकेटविश्वात १९८३ साली भारतानं पहिला विश्वचषक जिंकून क्रिडाविश्वावर छाप सोडली. भारतानं २५ जून १९८३ रोजी लॉर्ड्समध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघाला धुळ चाखली. याचीच आठवण करुन देत सचिन तेंडुलकरनं महिला संघाच्या विजयाचं कौतुक केलं.

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडू

  • लॉरा वोल्वाडने ५८४ धावा – २०२५ विश्वचषक
  • एलिसा हिली ५०९ धावा २०२२ विश्वचषक
  • रॅचेल हेन्स ४९७ धावा २०२२ विश्वचषक
  • डेबी हॉकले ४५६ धावा १९९७ विश्वचषक

डीवाय आहे बालेकिल्ला

२०२२ मध्ये भारतीय संघाने या मैदानावर दोन सामने खेळले होते. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका याच मैदानात खेळली होती. भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. गेल्या वर्षअखेरीस याच मैदानावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळली होती. भारताने