Sara Tendulkar Viral Photos with Mystery Friend: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते. सारा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून फोटो सातत्याने शेअर करत असते. दरम्यान सारा तेंडुलकरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये ती एका मुलासह दिसत आहे. त्या दोघांचे गोवा, लंडनमधील काही फोटो आहेत. तर सेल्फीदेखील आहेत. पण हा मुलगा नेमका कोण आहे, जाणून घेऊया.

अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याच्या बातम्यांमुळे तेंडुलकर कुटुंबीय चर्चेत आहे. अर्जुनचा रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्याबरोबर साखरपुडा झाल्याची चर्चा होती. पण याबाबत कोणीच अधिकृत माहिती दोन्ही कुटुंबांनी दिलेली नाही. यानंतर सारा तेंडुलकरने पिलाटे्स अकादमी सुरू केली आहे. साराच्या या नव्या अकादमीच्या उद्घाटनाचे फोटोदेखील स्वत: सारा आणि मग सचिन तेंडुलकरने देखील शेअर केले होते. यानंतर गेल्या दोन दिवसांपासून साराचे एका मुलाबरोबर फोटो व्हायरल होत आहेत.

सारा तेंडुलकरसह फोटो व्हायरल झालेला सिद्धार्थ केरकर कोण आहे?

सारा तेंडुलकरबरोबर या फोटोमध्ये असलेल्या मुलाचं नाव सिद्धार्थ केरकर आहे. सिद्धार्थ केरकर हा बिझनेसमॅन असल्याचं देखील म्हटलं जात आहे. याचबरोबर त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये तो चित्रकार असल्याचं दिलं आहे. तो आपल्या पेंटिग्ससह त्याचे वेगवेगळे लुक्सदेखील शेअर करत असतो.

सिद्धार्थ आणि सारा तेंडुलकरचे हे फोटो फार जुने आहेत आणि ते पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांचे जवळचे मित्र असल्याचं दिसत आहे आणि त्यामुळेच चाहत्यांनी साराचा सिद्धार्थ हा बॉयफ्रेंड असल्याचा उल्लेख केला आहे. पण या दोघांमध्ये नेमकं काय नात आहे, याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

सारा आणि सिद्धार्थचे हे व्हायरल झालेले फोटो २०२१-२०२२ मधील आहेत. लंडन आणि गोव्यामध्ये देखील सिद्धार्थ-सारा त्यांच्या मित्रपरिवारासह फिरताना दिसले होते. तर सिद्धार्थ केरकरचा साराचे आईबाबा म्हणजेच सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांच्याबरोबरचा एक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. त्यामुळे सिद्धार्थ साराच्या संपूर्ण कुटुंबाला ओळखतो, हे यावरून म्हटलं जात आहे. तर सिद्धार्थ सारासह आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचे सामने पाहतानादेखील स्टेडियममध्ये दिसला आहे.

सारा तेंडुलकरचं नाव भारताचा कसोटी कर्णधार शुबमन गिलबरोबरही जोडलं गेलं होतं. भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान युवराज सिंगच्या चॅरिटी डिनरला देखील दोघं जण एकत्र दिसले होते. शुबमन गिलने एका मुलाखतीत तो कोणालाही डेट करत नसल्याचं म्हटलं, पण तरीही सारा आणि गिल यांच्याबाबतची चर्चा मात्र थांबलेली नाही.